Mahindra कंपनीची धमाकेदार ऑफर, जुलै महिन्यात गाडी खरेदी केल्यास मिळणार तब्बल 3.05 लाखांपर्यंत सूट
महिंद्रा कार ( फोटो सौजन्य-फेसबुक)

लॉकडाऊन नंतर आता सर्व उद्योगधंद्यांना सुरुवात केल्यानंतर मोटर्स कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांची विक्री करण्यासाठी नवी आयडिया सुचवली आहे. त्यानुसार ग्राहकांना गाडी खरेदीसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता महिंद्रा (Mahindra) कंपनीने मे, जुन महिन्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा त्यांच्या एसयुवी (SUV) ची विक्री होण्यासाठी तब्बल 3.05 लाखांपर्यंत सूट देण्याची धमाकेदार ऑफर आणली आहे. त्यामुळे ग्राहकांनी जर जुलै महिन्यात गाडी खरेदी केल्यास त्यांना तब्बल 3.05 लाखांपर्यंतच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

महिंद्रा कंपनीच्या सर्वाधिक गाड्यांपैकी एक विक्री करण्यात येणाऱ्या गाडी बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये Mahindra XUV300 वर एकुण 64,5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. यामध्ये 30 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक डिस्काउंट, 25 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस, 45 हजार पर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 5 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.(Mahindra कंपनी घेऊन येणार 2 नव्या शानदार SUV, जाणून घ्या अधिक)

तसेच Mahindra XUV500 वर 39 हजार रुपयापर्यंत लाभ घेता येणार आहे. यामध्ये 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 9 हजार रुपयापर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंटचा सहभाग आहे. शहरांसह ग्रामीण भागात उत्तम पद्धतीने चालणारी Mahindra Scorpio वर एकूण 60 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. यामध्ये 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस दिला जाणार आहे. जर Mahindra Bolero बाबत बोलायचे झाल्यास यावर 13,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे.(1 एप्रिल पासून भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये होणार मोठा बदल; बंद होणार बीएस-4 वाहने)

वरील ऑफर्स दिल्लीसाठी लागू आहेत. परंतु विविध शहारांनुसार ऑफरच्या किंमतीत थोडा फरक असू शकतो. त्यामुळे गाडीच्या कोणत्या वेरियंटवर किती रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे हे जरुर लक्षात घ्या. तसेच एखाद्या मॉडेलबाबत अधिक माहिती हवी असल्यास महिंद्रा डीलरशीपच्या शॉपला भेट द्या.