सिंगल चार्जमध्ये 375km ची रेंज देणार XUV 300 Ev, जाणून घ्या खासियत
Mahindra and Mahindra logo (Picture Credits: Official website)

देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. अशातच नागरिकांकडून पारंपरिक इंधनाच्या ऑप्शन व्यतिरिक्त दुसरा पर्याय शोधत आहेत. तर भविष्याचा विचार केला असता बहुतांश वाहन निर्मात्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक व्हिईकल्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्वदेशी वाहन निर्माती कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्र आपली पॉप्युलर एसयुवी XUV 300 चे इलेक्ट्रिक वर्जन तयार करत आहे. जी कंपनीने 2020 च्या ऑटो एक्सो मध्ये झळवकली होती. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपली कार 2021 च्या अखरे पर्यंत लॉन्च करु शकते.(कारवरील Dent काढण्यासाठी 'या' सोप्प्या ट्रिक्स बद्दल अधिक जाणून घ्या) 

महिंद्रा कंपनीची एक्सयुवी 300 च्या ईवी वेरियंट बद्दल बोलायचे झाल्यास याची टक्कर टाटा कंपनीच्या नेक्सॉन ईवी सोबत होणार आहे. विक्रीच्या दृष्टीने गेल्या वर्षात ईवीच्या लिस्टमध्ये टाटा नेक्सॉनने प्रथम स्थान प्राप्त केले होते. सध्या ह्युंदाईची कोना आणि MG ची जेडएस ईवी हा ऑप्शन ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ही एसयुवी कंपनीने महिंद्रा इलेक्ट्रिक स्क्लेबल अॅन्ड मॉड्युलर आर्किटेक्चर वर तयार केली आहे. हे कंपनीचे इनहाउस पॉवरट्रेन प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये काही प्रकारचे पॉवरट्रेन असणारे इलेट्रिक मोटर्स असून ते 60Kw ते 280Kw ची क्षमता देते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा कंपनीच्या या एक्सयुवीच्या टॉप अॅन्ड वेरियंट सिंगल चार्जमध्ये 375 किमीची उत्तम ड्रायव्हिंग रेंज देणारी असणार आहे. तर याच्या स्टँडर्ड वेरियंटला एकदा फुल चार्ज केल्यानंतर 200 किमी पर्यंत चालवता येणार आहे. परंतु याबद्दल पूर्णत: पुष्टी ARAI द्वारे करणे अद्याप बाकी आहे. जी टेस्टिंगनंतर वाहन निर्मात्यांना त्यांच्या ड्रायव्हिंग रेंज नुसार ऑफिशिअल सर्टिफिकेट देते.(India’s First CNG Tractor: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लॉन्च केला भारतामधील पहिला सीएनजी ट्रॅक्टर; वर्षाला होईल लाखोंची बचत, जाणून घ्या वैशिष्ट्ये)

एक्सयुवी 300 ईवीचे लूक याच्या रेग्युलर फ्यूल मॉडेल प्रमाणेच असण्याची अपेक्षा आहे. कारण याची झलक गेल्या वर्षात ऑटो एक्सपो मध्ये दिसली होती. कारण इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिन कार सारखे ग्रिलची जरुरत भासत नाही. इंटिरियरमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे लेटेस्ट फिचर्स पहायला मिळणार असून कंपनीकडून या कारच्या लॉन्चिंग बद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.