जावा बाईक्स (Photo Credits: Twitter)

महिंद्रा अँड महिंद्राची जावा मोटारसायकल ( Jawa motorcycles) गुरुवारी भारतात लॉन्च करण्यात आली. कंपनीने या मोटारसायकलचे तीन नवे मॉडेल्स सादर केले. जावा, जावा 42, आणि जावा पेराक. कंपनीने या जावा बाईक्सची (Jawa bikes) प्रीबुकींग्स सुरु केली आहेत.

लॉन्च झालेल्या तीन मॉडेल्सपैकी दोनमध्ये 293 सीसी इंजिन आहे. तर Jawa Perak मध्ये 334 सीसीच्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. देशभरात एकूण 105 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, तसंच डिसेंबरपर्यंत अजून 64 डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी आणि टेस्ट राईडसाठी उपलब्ध होईल असं लाँचिंग कार्यक्रमात सांगण्यात आलं आहे.

बाईक्सच्या किंमती:

दी जावा – 1.64 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

जावा 42 – 1.55 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

जावा पेराक – 1.89 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)

तुम्हाला देखील ही बाईक खरेदी करायची असेल तर https://www.jawamotorcycles.com/booking या संकेतस्थळाला भेट द्या. बुकिंगपूर्वी तुम्हाला नाव, मोबाईल नंबर लिहून रजिस्टर करावा लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शहराचं नाव आणि डिलरचा ऑप्शन मिळेल. ते सिलेक्ट करा. त्यावर मॉडेलची निवड करा. रंगाचा पर्याय निवडा. त्यानंतर आधार कार्डची माहिती मागितली जाईल. त्यावर आधारकार्डवरील माहिती भरा. त्यानंतर पुढील क्रिया या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नवी विंडो ओपन होईल. त्यावर पेमेंट करा. मग तुम्हाला बुकींग कन्फर्मेशन मिळेल.