Lamborghini ने भारतात लॉन्च केली नवी कार, अवघ्या 3.6 सेकंदात पकडणार 100kmph चा वेग
Lamborghini urus pearl capsule edition (Photo Credits-Twitter)

Lamborghini India  ने आपली नवी Urus Perl Capsule Edition भारतात लॉन्च केली आहे. या स्पेशल अॅडिशन मध्ये अतिरिक्त कॉस्मेटिक बदलाव करण्यात आले आहेत. त्याचसोबत नव्या कलर ऑप्शन मध्ये सुद्धा ती झळकवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ग्लॉस फिनिशिंग आणि नव्या अलॉय व्हिल्स दिले गेले आहेत. कंपनीने Pearl Capsule अॅडिशनच्या किंमतीबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. तर Lamborghini Urus ची भारतीय बाजारात सुरुवाती एक्स शोरुम किंमत 3.15 कोटी रुपये आहे.(मार्च महिन्यात 'या' दमदार कारवर दिली जातेय भरघोस सूट, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक)

Lamborghini Urus Pearl Capsule Edition च्या पॉवर परफॉर्मेन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 4.4 लीटरचे टर्बोचार्ज्ड V8 इंजिन दिले असावे. याचे मोटर 641 bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 850 Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. याचे इंजिन 8 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशन लैस आहे. यामध्ये ऑल व्हिल ड्राइव्ह दिले गेले आहे.(BMW R NineT आणि R Nine Scrambler भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

Lamborghini urus pearl capsule edition (Photo Credits-Twitter)

वेगाबद्दल सांगायचे झाल्यास, ही जगातील एक सर्वाधिक वेगवान एसयुवीमधील एक आहे. यामध्ये 305 किमी प्रति तासाची टॉप स्पीड मिळणार आहे. ही कार अवघ्या 3.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास असा वेग पकडणार आहे.