मार्च महिन्यात 'या' दमदार कारवर दिली जातेय भरघोस सूट, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक
Honda Amaze (Photo Credits-Twitter)

भारतात यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच कारच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. कारच्या बेस मॉडेल ते टॉप मॉडेल्स महागड्या झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक सुद्धा त्या खरेदी करण्यापूर्वी विचार करत आहेत. अशातच आता कारच्या जरी किंमती वाढल्या असल्या तरीही होंडा कंपनीकडून ग्राहकांना दिलासा दिला जाणार आहे. कारण होंडा रेंजच्या बहुतांश कारवर उत्तम डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य संधी ठरु शकते. तर जाणून होंडा कंपनीच्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट तुम्हाला दिला जाणार आहे त्या बद्दल अधिक माहिती.

होंडा अमेज (Honda Amaze) च्या पेट्रोल आणि डिझेलवर 26,998 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 10 हजार रुपयांचा कॅशबॅक डिस्काउंट, 11,998 रुपयांची एक्सेसरीजसह 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. त्याचसोबत Honda Amaze Special Edition वर15 हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामध्ये 7 हजार रुपयांचा कॅस डिस्काउंट किंवा 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जाऊ शकतो.(Ford EcoSport SE भारतात लॉन्च, एक्सटीरियरमध्ये दिसणार 'हे' मोठे बदल)

तसेच कंपनीच्या New Honda WR-V वर जवळजवळ 32,527 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. यामध्ये 15 हजारांचा कॅश डिस्काउंट, 17,527 रुपयांची एक्सेसरीज आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर केला जात आहे. आणखी एक कंपनीची दमदार कार New Honda WR-V Exclusive Edition वर 25 हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यात 10 हजारांचा कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर केला जात आहे.