Ford EcoSport SE भारतात लॉन्च, एक्सटीरियरमध्ये दिसणार 'हे' मोठे बदल
Ford EcoSport Representative Image (Photo Credit: NetCarShow)

Ford EcoSport SE Launched:  भारतात Ford EcoSport SE  लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने ही एसयुवीची किंमत 10.49 लाख रुपये ठेवली आहे. यामद्ये काही बदल सुद्धा करण्यात आले असून यंदा त्यात स्पेअर व्हिल्स दिले जाणार नाही आहे. तर हे स्पेअर व्हिल्स आता टेल गेट येथून हटवण्यात आले आहेत. Ford EcoSport SE पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पेट्रोल मॉडेल बद्दल बोलायचे झाल्यास याची किंमत 10.49 लाख रुपये तर डिझेल मॉडेलची किंमत 10.99 लाख रुपये आहे. ग्राहकांना आपल्या पसंदीनुसार मॉडेल निवडू शकतात.(2021 Volkswagen T-Roc SUV भारतात लॉन्चिंगसाठी तयार, जाणून घ्या किती असू शकते किंमत)

कारच्या इंजिन आणि पॉवर बद्दल सांगायचे झाल्यास फोर्ड ईकोस्पोर्ट एसई मध्ये पॉवरट्रेन हे आधीसारखेच दिले आहे. यामध्ये 1.5 लीटरचे थ्री सिलिंडर TiVCT पेट्रोल इंजिन लावले आहे. जो 122PS ची कमीतकमी पॉवर आणि 149Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसरे इंजिन 1.5 लीटरचे TDCi इंजिन असून जे 100PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 215Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे.(TVS Apache RTR 200 4V सिंगल चॅनल ABS भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत)

फोर्ड ईकोस्पोर्ट एसईचा फ्रंट लूक सध्याच्या स्टँडर्ड मॉडल सारखाच ठेवला गेला आहे. त्यामुळे ही कार  जुन्या मॉडेल सारखीच दिसणार आहे. तर कारमध्ये SYNC 3 इन्फोटेंमेन्ट सिस्टिम दिले गेले असून जे अॅप्पल कार प्ले आणि अॅन्ड्रॉइड ऑटो सपोर्टसह येणार आहे.  कारचे लूक आणि डिझाइन हे अमेरिका आणि युरोप मध्ये विक्री करण्यात येणाऱ्या मॉडेल्स सारखाच आहे. टेल गेटमध्ये स्पेअर व्हिल्स सोडून एसयुवी मध्ये ग्राहकांना 16 इंचाचे अलॉय व्हिल्स आणि डुअल टोन रियर बंपर दिला जाणार आहे.