Lamborghini Huracan Evo भारतात लॉन्च; किंमत, फिचर्स जाणून घ्या
Lamborghini Huracan Evo Launched in India (Photo credit: Lamborghini / representative image)

Lamborghini कंपनीने आपल्या Huracan कारचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. भारतीय ऑटो मार्केटमध्ये या व्हर्जनचे नाव Lamborghini Huracan Evo असे आहे. या नव्या गाडीची मार्केटमधील एका शोरुममध्ये किंमत 3.37 कोटी रुपये असल्याचे समजते. नवी लॅम्बोर्गिनी उकारन गाडीच्या स्टाईलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यात पहिला बदल म्हणजे कारमध्ये पूर्वीपेक्षा अधिक शक्तिमान इंजिन देण्यात आले आहे. किमतीबाबत बोलायचे तर नव्या कारची किंमत जुन्या Huracan कारच्या किमतीच्या आसपासच आहे. जुन्या कारचीही किंमतही मार्केटमधील एका शोरुममध्ये 3.71 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

लँबोर्गिनीच्या शानदार सुपरकारमध्ये 5.2 लीटर V10 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 631 bhp ची पॉवर आणि 600 Nm टॉर्क जनरेट करते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवे मॉडेल 28 bhp इतकी अधिक पॉवर जनरेट करते. कंपनीने दावा केला आहे की, नवी कार केवळ 2.9 सेंकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडू शकते. या गाडीचे टॉप स्पीड 325 किलोमीट प्रतितास इतके आहे. जुनी उकारन 3.4 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग धारण करते.

उकारन इवोमध्ये नया फ्रंट आणि रियर बंपर, रियर डिफ्यूजर आणि नवे ट्विन एग्जॉस्ट पाईप देण्यात आले आहेत. या कारमध्ये LDVI नावाचे चेसिस कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. ही नवी सिस्टम सुपरकारच्या स्पीडसोबतच अनेक नव्या गोष्टींना मॉनिटर आणि कंट्रोल करते. लँबोर्गिनीने या कारमध्ये Y-शेप स्पोकवाले नवे अलॉय विल्ज दिले आहेत. (हेही वाचा, भारतातील पहिली Cadillac Escalade मराठी माणसाच्या दारी; साडेपाच कोटींची ही गाडी वापरतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष)

कारच्या केबिनबाबात सांगायचे तर, यात 8.4 इंचाचे टचक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. जी अॅपल कारप्ले आणि वॉयस कमांड सपोर्टसोबत येते. जुन्या कारच्या तुलनेत नव्या कारमध्ये अधिक इंटरनल स्टोअरेजही देण्यात आले आहे. यात हाय कपॅसिटी हार्ड डिस्कसोबतच ड्यूअल कॅमेरा टेलीमेट्री सिस्टमचा नवा पर्यायही देण्यात आला आहे. भारतीय बाजारात या कारची स्पर्धा Ferrari 488 GTB आणि Audi R8 V10 Plus या कारसोबत असेल.