श्रीमंतांचे चोचले पुरवणाऱ्या अनेक गाड्या भारतात उपलब्ध आहेत. यातीलच एक गाडी म्हणजे कॅडिलॅक एस्कलेड (Cadillac Escalade). ही गाडी जगातील श्रीमंतांची पसंती आहे. भारतामध्ये ही गाडी पहिल्यांदाच दाखल झाली. तर ही गाडी टाटा बिर्ला, कोणी फिल्मस्टारच्या नाही तर एका मराठी माणसाच्या घराची शोभा वाढवत आहे. भिवंडीतमधील दिवा गावी राहणाऱ्या अरूण पाटील यांनी कॅडिलॅक गाडी विकत घेतली आहे. अरूण पाटील भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पूर्व सभापती आहेत. भारतात अनेक उद्योगपती आणि फिल्मस्टारची ही गाडी बुक केली आहे,
या लॅविश आणि लक्झरिअस असलेल्या या कारची किंमत आहे तब्बल पाच कोटी 50 लाख रुपये. मोठ मोठ्या देशांचे राष्ट्रपती ही गाडी वापरतात. ही गाडी खास सुरक्षेसाठी बनवली आहे. या कारच्या चारही बाजूने सेन्सर्स आहेत. रस्त्यात खड्डा आला, अपघात होणार असेल, तर कार स्वतःच सावरते. कारचा स्पीड आणि ब्रेक ऑटोमॅटिकली कंट्रोल होतात. कारच्या मागे-पुढे कॅमेरा आहेत. गाडीत क्लायमेट कंट्रोलही होते. गाडीत वायफायचीही सुविधा आहे. अगदी पंचतारांकित हॉटेल्समध्ये असतात अशा इतर अनेक सुविधा या गाडीत देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा : टाटा मोटर्सकडून आपल्या बहुप्रतीक्षित एसयूव्ही – हॅरियरचे अनावरण)
अरुण पाटील यांनी वर्षभरापूर्वी या गाडीची नोंदणी केली होती. आता गाडीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कार रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतामधील ही पहिला कार आता चर्चेचा विषय बनत आहे. भिवंडीसारख्या शहरात ही गाडी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमत आहे. एका मराठी माणसाकडे ही गाडी आल्याचा अभिमानही वाटत आहे.