किआ मोटर्स यांनी नुकतीच त्यांची Kia Sonet भारतात लॉन्च केली होती. भारतात ही कार कॉम्पॅक्ट SUV आधारावर लॉन्च केली गेली आहे. तसेच ही कार भारतातच तयार करण्यात आली आहे. किआच्या या मेड इन इंडिया कारची मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या अनंतपुर येथे केली जाते. त्यानंतर या कारचे बिग वर्जन येत्या 11 नोव्हेंबरला लॉन्च केले जाणार आहे.(Kia Sonet ची प्री-बुकिंग सुरु, मोजावे लागणार केवळ 25,000 रुपये)
कंपनी मलेशिया येथे किआ सॉनेटचे जे वर्जन लॉन्च करणार आहे त्याची लांबी भारतीय वर्जन पेक्षा 125mm अधिक आहे. भारतात निर्माण करण्यात आलेली ही कार जवळजवळ 70 देशात एक्सपोर्ट करणार आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबरला हे वर्जन मलेशियात लॉन्च केले जाणार आहे. किआच्या या कॉम्पेक्ट SUV साठी 10.25 इंचाचा टचस्क्रिन इंफोटेन्मेंट दिला गेला आहे. या व्यतिरिक्त कारमध्ये Bose चे 7 स्पीकर सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक सनरुफ, फ्रंट वेंटिलेटेड सीट्स दिल्या गेल्या आहेत. ही कार स्मार्टवॉच सोबत सुद्धा कनेक्ट करता येणार आहे.(बहुप्रतिक्षित Kia Sonet Compact SUV कार अखेर भारतात लाँच; याचे शानदार फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क)
भारतात किआची ही कार 3 ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त कारसाठी 5 स्पीड मॅन्युअल, सिक्स स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चे ऑप्शन मिळणार आहे. किआ सॉनेट GT Line ला 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन वेरियंट्स मिळणार आहे.