भारतीय 'ही' बाईक सर्वात जास्त इंटरनेटवर शोधतात!
जावा बाईक्स (Photo Credits: Twitter)

Jawa कंपनीच्या बाईकची भारतीय नागरिक खूप वेळा पासून प्रतिक्षा करत होते. तर एका धमाकेदार एन्ट्रींने पुन्हा एकदा जावा कंपनीने बाईकचे नवे मॉडेल ग्राहकांसाठी लाँन्च केले आहे. तसेच 2018 मध्ये सर्वात जास्त सर्च केलेला हा टॉप ब्रँन्ड ठरला आहे. तसेच भारतीय जास्त करुन जावाच्या नव्या मॉडेलबद्दल जाणून घेण्यासाठी जास्त उत्सुक असतात.

जावा कंपनीने गेल्या वर्षात दोन नवीन मॉडेल लाँन्च केले आहेत. Jawa आणि Jawa 42 हे दोन नवीन मॉडेलची विक्री मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून सुरु होणार आहे.तसेच जावा कंपनी तिचे अजून एक नवं मॉडेल Jawa Perak सुद्धा लवकरच लाँन्च करणार आहे. तसेच गुगल (Google) वर सर्वात जास्त सर्च केलेल्या बाईकमध्ये TVS Apche कंपनीची बाईक सामील झाली आहे. याचे मुख्य कारण नुकतेच या कंपनीने Apache RR 310 बाईक लाँन्च केली होती. तसेच अपाचे कंपनीच्या मॉडेलमधील 160 ते 310 CC पर्यंतच्या बाईक विकल्या जात आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर सर्च केलेली बाईक म्हणजे Suzuki Intruder आहे. ही एक क्रूझर बाईक असून त्याचे डिझाईन आणि कमी किंमती मुळे खूप प्रसिद्ध आहे. या बाईकला Suzuki Gixxer 155 हे इंजिन देण्यात आलेले आहे.