Hyundai Alcazar भारतात लॉन्च, जाणून घ्या धमाकेदार फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक
Hyundai Alcazar (Photo Credits-Twitter)

ह्युंदाई कंपनीने त्यांची Hyundai Alcazar भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही तीन ट्रिम्समध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये Prestige, Platinum आणि Signature चा समावेश आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना ह्युंदाई अल्काजार मध्ये एकूण 12 वेरियंट्समधील निवडण्याचा ऑप्शन मिळणार आहे. ह्युंदे अल्काजार एसयुवीची सुरुवाती किंमत 16.3 लाख रुपये आहे. याच्या टॉप अॅन्ड वेरियंटची किंमत 20 लाख रुपये आहे. ग्राहकांना यामध्ये 6 सीटर आणि 7 सीटर सारखे दोन सीटिंग ऑप्शन मिळणार आहेत.(Audi लवकरच घेऊन येणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 400km अंतर कापणार)

Hyundai Alcazar भारतात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. याचा 2.0 लीटर MPi पेट्रोल इंजिन 6500 आरपीएमवर 159 PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 4500 आरपीएमवर 191Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. याच्या 1.5 लीटर CRDi डिझेल इंजिन 4000 आरपीएमवर 115PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 1500 ते 2750 आरपीएमवर 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. दोन्ही इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे ऑप्शन मिळणार आहे.(भारतात लॉन्च झाल्या दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 125Km अंतर कापणार)

Twitter:

भारतीय बाजारात Hyundai Alcazar चा MG Hector Plus, Tata Safari आणि आगामी Mahindra XUV700 सोबत थेट टक्कर होणार आहे. या कारची बुकिंग आधी पासूनच सुरु झाली आहे. ग्राहकांना कंपनीच्या या अधिकृत डिलरशिप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर बुकिंग करता येणार आहे. यासाठी ग्राहकांना 25 हजार रुपयांची टोकन द्यावे लागणार आहे.