Honda City ची पॉवरफुल आणि स्टायलिश हॅचबॅक लॉन्च, जाणून घ्या किंमत
Honda City Hatchback (Photo Credits-Twitter)

काही महिन्यांपूर्वी सेडान सेगमेंट मधील पॉप्युलर असणारी नवी होंडा सिटी फिफ्थ जेनरेश लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर आता कंपनीने त्यांची धमाकेदार हॅचबॅक कार लॉन्च केली आहे. जी 2021 Honda City Hatchback आहे. ही कार दिसण्यात अगदी पॉवरफुल आणि स्टायलिश आहे. मात्र सध्या ही कार थायलंड येथे लॉन्च केली आहे. या कारचे बेस मॉडेल S+ trim ची किंमत 14.62 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे. याच्या SV Trim ची किंमत 16.47 लाख रुपये तर टॉप मॉडेल RS Trim ची किंमत 18.28 लाख रुपये आहे.(नवी MPV Suzuki Solio Bandit लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

होंडा सिटी हॅचबॅक 202 थायलंडसह मलेशिया आणि इंडोनेशिया मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. होंडा कंपनीची ही कार All New Honda City च्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. ज्याचे फिचर्स आणि कॉम्पोनेंट्स सुद्धा सारखेच आहेत. तर भारतीय बाजारात ही लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. 2021 Honda City Hatchback च्या डिझाइन आणि फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास याचे फ्रंट आणि साइड प्रोफाइल नव्या होंडा सिटी साऱखेच आहे. मात्र कारचा रियर लूक अगदी वेगळा आहे, या कारमध्ये डार्क क्रोम फिनिश असणारे 16 इंचाचे अलॉय व्हिल्स दिले गेले आहेत.(Hero MotoCorp ची यंदाच्या फेस्टिव सीजन मध्ये 14 लाखांहून अधिक दुचाकींची विक्रमी विक्री)

या हॅचबक कारचे फिचर्स अगदी दमदार आहेत. इंजिनसाठी यामध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल मोटर दिली आहे. जी 5500rpm वर 122 एचपीची मॅक्सिमम पॉवर आणि 2000-4500rpm वर 173 Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. या कारमध्ये 8 इंचाचा इन्फोटेन्मेंट दिला आहे. याची केबिन पूर्णपणे ब्लॅक रंगाची आहे. या कारची खासियत म्हणजे ड्रायव्हिंग सीट सोडून अन्य सीट्स फोल्ड करता येऊ शकतात.