
गेली काही महीने ऑटोमोबाइल इंडस्ट्रमध्ये होणारी उलाढाल काहीशी मंदावली आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्रात कारची विक्रीही मंदावली आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्यांवर आपल्या उत्नादनांची विक्री कशी करायची याबाबत मोठा दबाव आहे. ह्युंदाई आणि मारुती सुझुकी यांसारख्या मोठ्या कंपन्यांही या दबावाखाली आहेत. त्यामुळेच या कंपन्या आपल्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर डिस्काऊंट देत आहेत. आज आम्ही आपल्याला मारुती (Maruti Cars) सुझुकीच्या कारवर मिळणाऱ्या डिस्काऊंटबाबत माहिती देत आहोत. एनबीटीने याबाबत वृत्त दिले आहे.
मारुती सिलैरियो
मारुती सिलैरियो कारवर 20,000 रुपये कॅश डिस्काऊंट आणि 10,000 रुपयांचा फ्रीडम डिस्काऊंट ऑफर आहे. एक्चेंज वर 20,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंटही मिळत आहे. 2500 रुपयांचा इंस्टीट्यूशनल ऑफरही या कारवर उबलब्ध आहे. तर CNG मॅन्यूअल ट्रान्समशिन व्हर्जनवर 15000 रुपयांचा फ्रीडम ऑफर डिस्काऊंट आहे.
मारुती ऑल्टो 800
मारुती ऑल्टो 800 कारवर 15000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतो आहे. या शिवाय फ्रीडम ऑफरच्या माध्यमातून 5000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंटही या कारवर मिळतो आहे. BSIV कम्प्लायंट मॉडेल्स वर 10,000 रुपयांचा अॅडिशनल डिस्काऊंटही या कारवर मिळत आहे. याशिवाय 5000 रुपयांची इंस्टीट्यूशनल ऑफर आणि 20,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काऊंट ऑफरही या कारवर उपलब्ध आहे.
मारुती ऑल्टो K10
ऑल्टो K10 कारवर 62,000 रुपयांची डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. यात 15,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 5,000 रुपये इतकी फ्रीडम ऑफर आणि BSIV मॉडल्स वर 10,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट मिळतो आहे. या शिवाय 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 5000 रुपयांचा इंस्टीट्यूशनल डिस्काऊंट आणि फ्रीडम ऑफरच्या माध्यमातून 5,000 रुपये डिस्काऊंट ऑल्टो K10 वर मिळत आहे. (हेही वाचा, खुशखबर! इलेक्ट्रिक वाहने झाली स्वस्त; GST मध्ये मोठी कपात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
मारुती ईको
लो कॉस्ट एमपीव्ही या लोकप्रिय कारवर 22,500 रुपयांचा डिस्काऊंट ऑफर केला जात आहे. या एमपीव्ही वर पेट्रोल व्हर्जन (अॅंब्युलन्स व्हर्जन सोडून) 5000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतो आहे. याशिवाय 5000 रुपयांचा फ्रीडम ऑफर आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळत आहे.
ऑटोमोबाइल क्षेत्रातील अभ्यासक सांगतात की, ऑटोक्षेत्रातील सध्याचे वातावरण हे कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगले आहे. मात्र, कार उत्पादक आणि कार विक्रेत्यांसाठीह मात्र हे वातावरण तितकेसे चांगले नाही. त्यामुळे कार खरेदीसाठी ग्राहकांनी जरी पसंती दर्शवली तरी, विक्रेते मात्र काहीसे नाराज असण्याची शक्यताच आहे.