डिटल (Detel) यांनी आज मुंबईत आयोजित केलेल्या इंडिया ऑटो शो 2021 मध्ये बी2सी क्षेत्रासाठी इलेक्ट्रिक स्कूटर डिटल ईजी प्लस आणि बी2सी क्षेत्रासाठी डिटल ईजी लोडर स्कूटरची घोषणा केली आहे. देशात वाढत्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक स्कूटर वजनाने अत्यंत हलक्या असून त्या वृद्ध लोक सुद्धा अत्यंत सहजपणे चालवू शकतात.(भारतात Renault Kiger ची 'या' दिवशी सुरु होणार बुकिंग, जाणून घ्या सविस्तर)
कंपनीने 2020 मध्ये खिशाला परवडेल अशा किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर डिटल ईजी उतरवली होती. होम ग्रोन कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Detel इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 60 किमी अंतर कापण्यास सक्षम असणार आहे. या स्कूटरमध्ये 20Ah चे लिथिअल आयन बॅटरीचा वापर केला जाणार आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो. स्कूटरमध्ये 170mm चे ग्राउंड क्लिअरेंस दिले गेले असून त्याच्या मदतीने कच्च्या रस्त्यांवर सहजपणे चालवता येणार आहे.
डिटल ईजी प्लस चार रंगात उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये पिवळा, लाल, टील ब्लू आणि रॉयल ब्लू यांचा समावेश आहे. तर डिटल ईजी लोडर सफेद रंगात उपलब्ध होणार आहे. भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी काही अभियानांबद्दल सुद्धा घोषणा केली आहे. सरकारने स्वदेशी ईवी कंपन्यांना परवडतील अशा किंमतीत इलेक्ट्रिक वाहन तयार करणे किंवा विक्री करण्यासाठी मार्ग दाखवला आहे. येणाऱ्या वर्षात याची निर्यात सुद्धा केली जाणार आहे.(Suzuki Gixxer 250 सीरिज मधील बाइकच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या अधिक)
डिटलचे संस्थापक डॉ. योगेश भाटिया यांनी असे म्हटले आहे की, आम्ही भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. या ऑटो एक्सपो मध्ये आम्ही डिटलची मौलिक परंपरा पुढे चालू ठेवण्याची आणि त्याला एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत.