भारतात Renault Kiger ची 'या' दिवशी सुरु होणार बुकिंग, जाणून घ्या सविस्तर
Renault Kiger (Photo Credits-Twitter)

रेनॉल्ट इंडिया (Renault India) कंपनी लवकरच आपली आलिशान आणि जबरदस्त फिचर्स असलेली Renault Kiger कार लवकरच भारतात लाँच करणार आहे. येत्या 15 फेब्रुवारी 2021 ला ही कार भारतात लाँच होणार आहे. याबाबत आधीच कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र या कारची बुकिंग कधी सुरु होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. रेनॉल्टची कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची बुकिंग डेट माहित असणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची बुकिंग लाँचिंग दिवशी म्हणजेच 15 फेब्रुवारीला सुरु होणार आहे.

सध्या Renault Kiger ची डीलरशिप लेवल बुकिंग सुरु झाली आहे. जेथे ग्राहकांना 10,000 ते 25,000 रुपये मोजून टोकन दिले जात आहे. ही रक्कम पूर्णपणे रिफंडेबल आहे.हेदेखील वाचा- Mahidnra Scorpio चे सर्वात स्वस्त S3+ मॉडेल लॉन्च, उत्तम फिचर्ससह मिळणार दमदार डिझाइन

या कारच्या डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास स्कल्पट टेलगेट, एक आकर्षक सी आकरचे एलईडी टेल लॅम्प क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप लॅम्प, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बंम्पवर दिला जाईल. त्याचसोबत पुढील बाजूस ब्लॅक बंम्पर क्लॅडिंग, 16 इंचाचा अलॉय व्हिल, ब्लॅक बी. पीलर आणि रेग्युलर पुल टाइप डोस हँडल दिला जाऊ शकतो.

कारच्या इंटिरियरमध्ये डुअलर टोन कलर स्किम दिला जाणार आहे. यामध्ये Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसाठी डॅशबोर्ड असणारा आठ इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रुज कंट्रोल, पुश बटण स्टार्ट व स्टॉप बटण, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी फंक्शनल स्टिअरिंग व्हिल यांचा समावेश असणार आहे.तसेच नॅच्युरल एस्पिरेटेड 1.0 लीटर तीन सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनचा उपयोग केला जाणार आहे. अशी अपेक्षा आहे की, याच्या टॉप अॅन्ड वेरियंटमध्ये कंपनी सीवीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देईल. सध्या किंमती बद्दल दावा करणे मुश्किल आहे पण सुरुवाती किंमत 5 लाख असण्याची शक्यता आहे.