Coronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही
Maruti Suzuki (Photo Credits-Twitter)

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचे (Coronavirus)  संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाने आतापर्यंत 42 हजारहून अधिक भारतीयांना आणि जगभरातील 35 लाखाहून अधिकांना आपल्या विळख्यात अडकवले आहे. या भारतात आता 17 मे पर्यंत लॉक डाऊन (Lockdown) ठेवण्यात आले आहे. या काळात काही व्यवसायांना सूट दिली गेली असली तरी खरेदी करण्यासाठी नागरिकांना काही घराच्या बाहेर पडणे शक्य होत नाहीये, परिणामी बड्या व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील ऑटो मोबाईल (Auto-Mobile)  क्षेत्रातील विख्यात नाव मारुती सुझुकी (Maruti Suzuki)  या कंपनीला सुद्धा धक्का बसला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात मागील एक महिन्यात म्हणजेच एप्रिल 2020 मध्ये मारुतीची एकही गाडी विकली गेली नसल्याचे समजतेय.

भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्री च्या इतिहासात अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी ऑटो मोबाईल क्षेत्रात मंदी असतानाही व्यापार ठप्प झाला आशु परिस्थिती उद्भवली नव्हती. मात्र आता, संपूर्ण महिना एकही गाडे विकली गेली नसल्याने सर्वात मोठ्या कंपनीला सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. व्यापार ठप्प असल्याने आता कर्मचाऱ्यांना पगार देण्याबाबतही प्रश्न कंपनीसमोर उभा ठाकला आहे. याबाबत ANI या वृत्तसंस्थेने ट्विट मार्फ़त माहिती दिली आहे. खुशखबर! भारतीय बाजारात पुन्हा सादर होणार Maruti 800; कंपनीकडून होत आहे दोन नव्या कार्सची निर्मिती, 5 लाखाहून कमी किंमत

ANI ट्विट

दरम्यान, कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता देशात कोरोनाबाधितांचा आकाड 42,533 वर पोहचला आहे. त्यापैकी 29,453 रुग्ण उपचार घेत असून 11,707 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 1373 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.