देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) देशांतर्गत बाजारपेठेत, वाहन लाइन-अपमध्ये नवीन अपडेट देणार आहे. कंपनी बाजारात दोन नवीन छोट्या गाड्या सादर करण्याची तयारी करत आहे, यात 800 सीसी क्षमतेची कारदेखील (Maruti 800) असेल. या नवीन प्रकल्पावर कंपनीने काम सुरू केल्याची माहिती मिळत आहे. या गाड्यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. 800 सीसी इंजिन क्षमतेव्यतिरिक्त, कंपनी इतर कारमध्ये 1 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरणार आहे. या कार्ससह कंपनी एंट्री लेव्हल विभागातील आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
कंपनीच्या सर्वात स्वस्त कारची, मारुती अल्टोची नवीन इंजिन स्टँडर्डस बाजारात आल्यानंतर त्याची किंमतही वाढली आहे. याशिवाय नवीन अपडेट्सद्वारे ग्राहकांना कमी किंमतीत नवीन मॉडेल्सही मिळतील, ज्यामुळे कंपनीच्या विक्रीत सुधारणा होईल अशी कंपनीची अपेक्षा आहे. मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक केनिची आयुकावा (Kenichi Ayukawa) यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, कंपनी 800 सीसी क्षमतेचे इंजिन इतर अनेक मॉडेल्समध्ये वापरणार आहे. सध्या हे इंजिन फक्त मारुती अल्टोमध्येच वापरले जाते.
त्याचबरोबर कंपनी आपल्या सेलेरिओ (Celerio) हॅचबॅकमध्ये 1 लिटर क्षमतेचे इंजिन वापरत आहे. कंपनीच्या 1-लीटर इंजिन मॉडेलमध्ये कोडनेम (YNC) आहे, जे कदाचित सेलेरिओच्या जागी सादर केले जाईल. मारुती 800 ही कंपनीची सर्वाधिक विक्री करणारी कार आहे आणि 1983 मध्ये प्रथम ती स्थानिक बाजारात बाजारात आली होती. त्यानंतर कंपनीने ही गाडी 2014 मध्ये बंद केली होती. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने या कारच्या 26 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री केली होती.
(हेही वाचा: 1 एप्रिल पासून भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये होणार मोठा बदल; बंद होणार बीएस-4 वाहने)
मारुती सुझुकी नेहमीच भारतीय ग्राहकांमध्ये 'परवडणाऱ्या कार्स देणारी कंपनी' म्हणून ओळखली जात आहे. अशा परिस्थितीत, नवीन मानदंडानुसार कमी किंमतीत छोट्या इंजिन गाड्यांचे उत्पादन करणे हे एक मोठे आव्हान असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सांगतात. मात्र सध्या कंपनी यावर काम करत आहे.