सावधान! 'या' एका बदलामुळे तुमच्या Car किंवा Bike ची RC रद्द होऊ शकते
प्रातिनिधिक प्रतिमा

सुप्रीम कोर्टाने मॉडिफाईड कार आणि बाईक यांच्याबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आता कारच्या स्टाईल आणि लूकमध्ये फेरबदल केल्यास गाडीचे रजिस्ट्रेशन केले जाणार नाही असे सांगितले आहे.तर सुप्रीम कोर्टाने मोटार वाहन नियमातील कलम 52(1) याबाबत अहवाल सादर करत या निर्णयाची घोषणा केली आहे.

जर तुम्ही वाहन अशा ठिकाणहून खरेदी करत असाल, ज्या ठिकाणी कंपनीने तयार केलेले मॉडेल हे ज्याच्याकडून खरेदी करणार असाल त्याने त्या मॉडेलमध्ये बदल केल्यास तुमच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन होणार नाही. त्यामुळे वाहनाताच्या कोणत्याही मॉडेलमध्ये बदल करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा. मॉडेलमध्ये बदल केलली गाडी तुम्ही फक्त कमी किंमत आणि जास्त स्पेसिफिकेशन आहे म्हणून देत असाल तर थांबा. मात्र गाड्यांचे स्पेसिफिकेशन हे अगोदरच कंपनीकडून पुरेशा प्रमाणात देण्यात आलेले असते. त्यामुळे तुम्ही गाडीमध्ये बदल केलेले मॉडेल घेत असाल तर कंपनी यासाठी जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.(हेही वाचा-Maruti Suzuki होणार महाग, जाणून घ्या वाढलेली किंमत)

कोणतीही कार किंवा बाईक कंपनी त्यांचे कोणतेही मॉडेल जेव्हा लाँन्च करते त्यापूर्वी ते ग्राहकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतात. तसेच कंपन्यांकडून गाडीचे मॉडेल पूर्ण तयार करुन झाल्यानंतर एकदा टेस्टिंग ड्राईव्ह केले जाते.