Maruti Suzuki मॉडेलमधील कार महाग झाली आहे. तसेच कंपनीने सध्या चालू असलेल्या कारच्या किंमतीमध्ये जवळजवळ 10 हजार रुपयांनी वाढ केली आहे. तर वस्तूंची वाढती किंमत आणि विदेश मुद्रा विनिमयाच्या दरामुळे होणारी समस्या दूर करण्यासाठी दहा हजार रुपयांनी किंमती वाढविल्याचे सांगितले आहे.
दिल्लीमधील सुझुकीच्या शोरुम येथे गुरुवार (10 जानेवारी) पासून दहा हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर सुझुकीच्या नेमक्या कोणत्या- कोणत्या मॉडेलवर ही किंमत वाढली असल्याचे सांगितले नाही. तसेच मारुती कंपनीव्यतिरिक्त BMW,Hyundai, Tata Moters, Honda या सारख्या कार कंपनीने ही किंमतीत वाढ केली आहे.
भारतात सध्या मारुती कंपनीची ऑल्टो 800 पासून ते प्रिमियम क्रॉसओवर एस क्रॉस पर्यंतची रेंज उपलब्ध आहे. या कारची किंमत 2.53 लाख रुपये पासून 11.45 लाख रुपयापर्यंत आहे. कंपनी हे कारचे मॉडेल्ल अरिना आणि नेक्सा शोरुम येथे ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देतात. येत्या 23 फेब्रुवारी, 2019 रोजी मारुती कंपनी वॅगनारचे नवं मॉजेल लाँन्च करणार आहे.