ब्रिटीश लक्झरी कार निर्माता मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह (Mclaren Automotive) भारतीय ऑटोमोबाईल बाजारात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. या वर्षी कंपनी भारतात आपले पहिले आउटलेट उघडणार आहे. मॅक्लारेन या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत मुंबईत आपले पहिले आउटलेट उघडेल. भारतीय बाजारपेठ हे कार निर्मात्याचे 41 वे जागतिक क्षेत्र असेल जिथे कंपनी व्यवसाय करेल. कंपनीचे मुंबईतील रिटेल आउटलेट मॅक्लारेन मॉडेल्सच्या संपूर्ण श्रेणीवर विक्री आणि विक्रीनंतर सर्व्हिसिंग ऑफर करेल.
मॅकलरेन ऑटोमोटिव्हने दिलेल्या निवेदनानुसार, कंपनीच्या जगभरातील विस्ताराच्या उद्दिष्टांमध्ये ऑक्टोबरमध्ये भारतातील पहिले रिटेल स्टोअर सुरू करणे समाविष्ट आहे. यामुळे आशिया पॅसिफिक प्रदेशात ब्रँडची उपस्थिती आणखी मजबूत होईल. मॅक्लारेन यूकेच्या प्लांटमध्ये असेंबल केलेल्या हाताने बनवलेल्या विविध प्रकारच्या सुपरकार्सची विक्री करते.
मॅक्लारेन ऑटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक पॉल हॅरिस म्हणाले, ‘भारत ही लक्झरी आणि प्रिमियम कारसाठी मोठी बाजारपेठ आहे. येथील लोक बाहेरील देशातून मॅक्लारेन कार आयात करतात. आम्ही लवकरच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आमचे पहिले रिटेल स्टोअर सुरू करणार आहोत. भारतीय ग्राहकांना कंपनीच्या सुपरस्पोर्ट्स आणि हायब्रीड कार्सची ओळख करून देण्याचे आमचे ध्येय आहे.’ कंपनी भारतात आपल्या 720S सुपरकार्सची Coupe आणि Spyder रेंज ऑफर करणार आहे. यासोबतच कूप आणि स्पायडर कारही नवीनतम 765LT रेंजमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (हेही वाचा: एकदाच चार्ज करा आणि 483Km चालवा, ऑप्टी बाईक आर 22 एव्हरेस्ट लॉन्च; किंमत, फिचर्सबद्दल घ्या जाणून)
McLaren ने नुकतीच McLaren GT सुपरकार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने भारतात या कारच्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी घेतली. भारतात विकली जाणारी ही सर्वात स्वस्त मॅक्लारेन कार आहे. McLaren GT फक्त 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते, तर शून्य ते 200 किमी प्रतितास वेग येण्यासाठी 9 सेकंद लागतात. या सुपरकारचा टॉप स्पीड 327 किमी प्रतितास आहे.