BMW ने जाहीर केला अपकमिंग C400 GT मॅक्सी स्कूटरचा नवा टीझर, जाणून घ्या अधिक
BMW C 400 GT (Photo Credits-Twitter)

BMW Motorrad India ने अपकमिंग C 400 GT मॅक्सी स्कूटर पुन्हा एकदा लॉन्चिंग पूर्वी त्याचा टीझर लॉन्च केला आहे. ही एक दमदार स्कूटर असून त्याची क्षमता सामान्य स्कूटरपेक्षा अधिक आहे.काही निवडक BMW डिलरशिपवर अपकमिंग स्कूटरची बुकिंग सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना ती 1 लाख रुपयांचे टोकन देऊन बुक करता येणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या दमदार स्कूटरच्या किंमतीबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

बीएमडब्लू सी400 जीटी मॅक्सी स्कूटर पूर्वी प्रमाणेच काही आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या दमदार मॅक्सी स्कूटरच्या इंजिनसाठी कंपनीने यामध्ये एक 350 सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन ऑफर केले आहे. जे 7500 आरपीएमवर 33.5 बीएचपीची अधिकतम पॉवर आणि 5750 आरपीएमवर 35 एनएनचा पीक टॉर्क आउटपुट देते. इंजिन सीवीटी गिअरबॉक्ससह येणार आहे.(Tata Nexon EV ला टक्कर देणार 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये धावणार 375KM)

BMW C 400 GT (Photo Credits-Twitter)

2021 साठी बीएमडब्लूच्या प्रिमीयम मॅक्सी स्कूटरला ट्रान्समिशन पेक्षा उत्तम पफॉर्मन्ससाठी नवे क्लच स्प्रिंगसह अपडेट करण्यात आले आहे. हे 139 किमी प्रति तास अधिकाधिक वेग पकडू शकते. स्कूटरच्या अन्य प्रमुख मॅकानिकल आणि फिचर अपडेट बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना नवे क्लच स्प्रिंग व्यतिरिक्त एका नवा ई-गॅस सिस्टिम दिला जाणार आहे. जो एक प्रकारचा थ्रॉटल बाय वायर सिस्टम आहे. याच्या अन्य प्रमुख अपडेटमध्ये अपग्रेटेड इंजिन मॅनेजमेंटसह एक नवे एग्जॉस्ट सिस्टमचा समावेश आहे.

अपडेटेड पॉवरट्रेन आता युरो 5 बीएस मानदंडाच्यानुसार आहे. तर मॅक्सी स्कूटर अपडे करण्यासाठी यामध्ये एक नवा कॅटलिक कन्वर्टर, एक नवा ऑक्सिजन सेंसर आणि त्याचसोबत संशोधित सिलेंडर हेड दिला गेला आहे. सेफ्टी फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने 2021 BMW C 400 GT मध्ये रिवाइज्ड ऑटोमॅटिक स्टेबिलिटी कंट्रोल दिला आहे. जो स्कूटरच्या रियर एंडवर लो-ट्रॅक्शन सरफेसवर उत्तम ग्रिप आणि अॅडीशनल ग्रिपसह स्टेबिलिटी देतो. याची किंमत 5-6 लाख रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.