Beneli कंपनीच्या दोन दमदार बाईक लवकरच भारतात होणार लाँन्च
Benli TRK 502 (Photo Credits - Twiter)

Beneli कंपनी येत्या नवीन वर्षात त्यांच्या दोन नवीन दमदार बाईक भारतात लाँन्च करणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात TRK 502 आणि TRK 502X ही दोन नवीन मॉडेल बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार  आहेत. अद्याप या बाईक कंपनीने बुकिंग चालू केली नसल्याचे सांगितले जात आहे.

बेनली ही कंपनी बाईक चाहत्यांसाठी त्यांच्या कंपनीच्या दोन नवीन दमदार बाईक भारतात लवकरच लाँन्च करणार आहेत. तर जानेवारी 2019 च्या शेवटच्या आठवड्यात या बाईकच्या बुकिंगसाठी सुरुवात केली जाणार आहे.TRK 502 ची किंमत 5.5 लाख असून TRK 502X या मॉडेलची किंमत TRK 502 पेक्षा 50 हजार रुपयांनी जास्त असणार आहे. या दोन्ही बाईकमध्ये 499.6 cc इंजन देण्यात आले आहे. त्याचबरोबर लिक्विड कूल्ड ट्विन इंजनही दिले आहे.TRK 502 या मॉडेलच्या बाईकची सीट 850mm असून ग्राऊंड क्लियरंस 220mm  ठेवण्यात आला आहे.

या बाईकच्या मॉडेलच्या पुढील बाजूस 320mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तसेच TRK 502 आणि trk 502X हे बेनली कंपनीचे पहिले प्रोडक्टस असून ते भारतात लाँन्च केले जाणार आहेत.