Bajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स
Bajaj Chetak Scooter | (Photo Credits: Facebook)

एकेकाळी सर्वसामान्यांचे पहिले प्रेम असणारी आणि बुकींग केल्यावर प्रत्यक्ष घरी येण्यासाठी बराच काळ वाट पाहाय लावणारी बजाज चेतक स्कूटर ( Bajaj Chetak Scooter) पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येते आहे. तिसुद्धा Stylish Look घेऊन. एकेकाळी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेली ही स्कूटर गेली 13 वर्षे जवळपास रस्त्यावरुन गायब होती. हळूहळू या दुचाकीची जागा स्कुटीने घेतली. त्यामुळे बजाच चेतक तशी कालबाह्य झाली. पण, आता पुन्हा एकदा हीच बजाज चेतक आकर्षक आणि पूर्णपणे नव्या रुपात पुन्हा एकदा मार्केटमध्ये येण्यास सज्ज झाली आहे.

स्टायलीश लूक, दमदार फिचर्स

तुम्ही जर जुन्या बजाज चेतक स्कूटरशी नव्या बजाज चेतकची तुलना करत असाल तर तुम्हाला बराच फरक पाहायला मिळेल. जुन्या बजाच चेतकमध्ये 145 सीसी 2-स्ट्रोक इंजिन होते. जे 10.8 एनएम टार्क सोबत 7.5 बीएचपी इतकी शक्ती निर्माण करत असे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नव्या बजाज चेतकमध्ये 125 सीसी इंजिन असणार आहे. तसेच, अलॉय व्हील, USB चार्जिंग पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिविटी, कंबाइन्ड ब्रेकिंग सिस्टम (CBS) अशी काही दमदार फिचर्स असतील. नव्या स्कुटरला पुढच्या चाकाला डिस्क ब्रेकही असणार आहेत असे समजते. झीबिझनेसने दिलेल्या वृत्तात या गाडीची किंमत सुमारे 70,000 रुपये इतकी असू शकेल असे म्हटले आहे. (हेही वाचा, Gudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट)

होंडा अॅक्टीव्हा, पियाजियो, वेस्पा यांच्यासोबत सामना

दरम्यान, बजाज चेतक या स्कुटरचा नवे व्हर्जन प्रीमियम असेल आणि या गाडीचा थेट सामना होंडा अॅक्टीव्हा, पियाजियो, वेस्पा आणि अप्रीलिया SR150 यांच्यासारख्या टॉपच्या व्हेरियंटसोबत होणार असल्याचे भाकीत ऑटो विश्वातील जाणकार वर्तवतात.