सुजुकी या मोटारसायकल कंपनीने आपल नवं मॉडेल असणारी 2019 Suzuki Access 125 नुकतीच भारतात लॉन्च केली आहे. या स्कुटरसाठी कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टिम (CBS) सह लॉन्च करण्यात आली आहे. या नव्या मॉडेलची किंमत फक्त 55,667 रुपये असणार असून ग्राहकांच्या खिशाला परवडणारी ठरणार आहे. तर नॉन सीबीएस वेरिएंट असलेल्या स्कुटरची किंमत 55,977 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर ग्राहकांच्या दृष्टीने सुरक्षिततेबाबत पाहायला गेल्यास त्यावर फक्त 690 रुपयांची वाढ केली आहे.
अतिरिक्त CBS दिले असले तरीही Access 125 स्कूटर मध्ये अजून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर 55,977 रुपये किंमत असणाऱ्या नॉन-सीबीएस वेरिएंट हे मॉडेल ग्राहकांना उलब्ध होण्यासाठी 2019 च्या डेडलाइननुसार वेळ देण्यात आली आहे . Suzuki Access 125, 125cc या मॉडेल सर्वात जास्त खरेदी केल्या जातात. स्कुचरचे हे मॉडेल एकदम साध्या डिझायनच्या प्रतिकृतीतून साकारले आहे.
Access 125 खासकरुन वजनाने हलकी (101 किलोग्राम) आणि उत्तम इंजिन असल्याकारणाने पॉप्युलर आहे. या स्कुटरसाठी काही फीचर्स देण्यात आलेले आहेत. जसे अलॉय व्हील्स, एनॉलॉग डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वन-पुश सेंट्रल लॉकिंग सिस्टम, फ्रंट पॉकेट आणि पुढील बाजूस एक चार्जिंग सॉकेट सुद्धा दिले आहे. Access 125 5.6-लीटर फ्यूल टँकसह येते जी कंपनीने केलेल्या दाव्यानुसार 60km/l माइलेज देते.
2019 Suzuki Access 125 मध्ये यापूर्वीसारखेच 125cc एयर-कूल्ड इंजिन देण्यात आलेले आहे. जे 8.4bhp पॉवर आणि 10.2Nm चे पिक टॉर्क जेनरेट करु शकणार आहे. हे इंजिन तेच आहे जे कंपनीने नुकतेच लॉन्च केलेली मॅक्सी स्कूटर स्टाइल सारख्या Burgman Street मध्ये दिले जाते.