WHO on Coronavirus: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे सर्व देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोठा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने जगभरातील देशांना इशारा देताना म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ दिसू शकते.
IANS या वृत्तसंस्थेनुसार, WHO ने म्हटले आहे की, जगभरात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढू शकतात. याचे कारण म्हणजे कोरोनाची चाचणी सातत्याने कमी होत आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. याशिवाय डब्ल्यूएचओने हे देखील सांगितले आहे की, कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळू शकतात. WHO च्या मते, आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात. (हेही वाचा - COVID 19 Vaccine For Kids: 12-14 वयोगटातील मुलांसाठी 16 मार्च पासून Corbevax लसीकरणाला होणार सुरूवात; जाणून घ्या CoWIN Portalवर कसं कराल रजिस्टर)
चीनमध्ये वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण -
चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना WHO चा इशारा देण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा सर्वांना हैराण केले आहे. त्यामुळे अनेक भागात लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे, तर इतर भागात कडक कारवाई करण्यात येत आहे. येथे ओमिक्रॉन उप-प्रकार BA.2 ची प्रकरणे नोंदवली जात आहेत. हे प्राणघातक मानले जात नसले तरी त्याचा प्रसार वेगाने होत आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या विविध प्रकारांनी जगाला हैराण केले आहे. Omicron नंतर आता नवीन प्रकार देखील समोर आला आहे. ज्यामुळे चिंता वाढली आहे. इस्रायलमध्ये या प्रकाराची दोन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. असे सांगण्यात आले आहे की कोरोनाचे हे नवीन प्रकार कोविड-19, BA.1 आणि BA.2 च्या उप-प्रकारांनी बनलेले आहे. सध्या या प्रकाराबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. परंतु, ते फारसे धोकादायक नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
भारतालाही कोरोनाचा इशारा -
जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता भारतातही याबाबत अलर्ट आहे. जूनपर्यंत भारतात तिसऱ्या लाटेचा प्रभाव दिसून येईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच आरोग्य मंत्रालय कोरोनाबाबत सातत्याने बैठका घेत आहे. यासोबतच कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होताना दिसत असून त्याबाबत लादलेले निर्बंधही जवळपास हटवण्यात आले आहेत.