
Who is Vaibhav Taneja? : भारतातील कर्तूत्ववान लोक आज जगभरात पोहोचले आहेत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे सत्या नाडेला, सुंदर पिचाई. त्यातच आता एक नवं नाव जोडल गेल आहे. टेस्ला () येथे सध्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) असणारे भारतीय-अमेरिकन वैभव तनेजा. वैभव तनेजा (Vaibhav Taneja) सध्या चर्चेत आहेत. याचं कारण ईव्ही निर्मात्या कंपनीकडून वैभव तनेजा यांनी मिळणारं पॅकेज आहे. मोठ्या पदावर काम करत असताना भरगच्च पगाराच्या शर्यतीत वैभव तनेजा यांनी सत्या नाडेला(Satya Nadella), सुंदर पिचाई (Sundar Pichai) आणि इतर भारतीय-अमेरिकन समकक्षांना मागे टाकलं आहे.
आपल्या इतर हाय-प्रोफाइल स्पर्धकांच्या तुलनेत त्यांना मिळालेलं हे पॅकेज सर्वाधिक आहे. वैभव तनेजा यांची वर्षभरातील एकूण कमाई 139 दशलक्ष डॉलर्स आहे. ज्याचे भारतीय रुपयांमध्ये कॅक्यूलेशन केल्यास अंदाजे 1195.4 कोटी रुपये होतात. हा आकडा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारापेक्षा 13 पट जास्त आहे. तर, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या पगारापेक्षा दुप्पट होतो.
वैभव तनेजा कोण आहेत?
वैभव तनेजा हे टेस्ला येथे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत. टेक्सासमधील ऑस्टिन येथून ते काम करतात. वैभव तनेजा यांच्याकडे तब्बल 17 वर्षांहून अधिक कामाचा अनुभव आहे. याआधी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह तंत्रज्ञान, किरकोळ विक्री आणि दूरसंचार क्षेत्रात काम केलं आहे. वैभव तनेजा यांना यूएस GAAP ची चांगली जाण आहे आणि फायनान्शिल स्टेटमेंट ऑडिट आणि SEC फाइलिंगचा मोठा अनुभव आहे.
वैभव यांनी यापूर्वी टेस्लामध्ये चीफ अकाऊंटींग ऑफिसर आणि कॉर्पोरेट कंट्रोलर यासारख्या विविध पदांवर काम केलं आहे. त्यांनी सोलार सिटी आणि PricewaterhouseCoopers (PwC) या कंपन्यात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. येथे त्यांना अकाऊंटिंग संदर्भातील जटील समस्या हाताळण्याचा चांगला अनुभव मिलाला.