Sidhartha Mallya Married Girlfriend Jasmine: विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थने गर्लफ्रेंड जस्मिनसोबत केलं ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न, See Photos
Sidhartha Mallya Married Girlfriend Jasmine (PC - Instagram)

Sidhartha Mallya Married Girlfriend Jasmine: फरारी उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याने (Siddharth Mallya) त्याची दीर्घकाळाची मैत्रीण जस्मिन (Jasmine) सोबत लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्ल्याने सोशल मीडियावर जाहीर केले होते की, तो लग्न करणार आहे. आता अखेर त्याने त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड जस्मिनला आपला जोडीदार बनवले आहे. अलीकडेच सिद्धार्थ मल्ल्याने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सर्वांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये वधू जस्मिन साध्या गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे, तर सिद्धार्थ औपचारिक पोशाखात खूपच स्मार्ट दिसत आहे.

सिद्धार्थ मल्ल्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये, पहिल्या फोटोमध्ये तो आणि त्याची पत्नी कारमध्ये बसून अंगठी दाखवताना दिसत आहेत. दुसरा फोटो त्यांच्या लग्नादरम्यानचा आहे. सिद्धार्थ आणि जस्मिनने ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न करून एकमेकांना आपलेसे केले. वधूच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने पांढऱ्या रंगाचा क्लासिक पोशाख घातला होता, ज्यामध्ये ती खुपचं सुंदर दिसत होती. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी जस्मिनने लाईट मेकअप केला होता. (हेही वाचा - Vijay Mallya च्या अडचणीत वाढ; सर्वोच्च न्यायालय उद्या अवमान प्रकरणी शिक्षा सुनावण्याची शक्यता)

पहा फोटोज - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sid (@sidmallya)

याशिवाय, सिद्धार्थच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर, सिद्धार्थ क्लासिक ब्लॅक ट्राउझर्स घातलेला दिसत होता, ज्यामध्ये त्याने पांढरा शर्ट आणि ब्लॅक बो पेअर केले होते. त्या वर, सिद्धार्थने हिरव्या रंगाचे मखमली सूट जॅकेट घातले होते. या लूकमध्ये सिद्धार्थ खूपच डॅशिंग दिसत होता. समोर आलेल्या फोटोमध्ये सिद्धार्थ आणि जास्मिनच्या चेहऱ्यावरही लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sid (@sidmallya)

सिद्धार्थने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जस्मिनला प्रपोज केले होते. त्याने जस्मिनला प्रपोज करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, या फोटोंमध्ये सिद्धार्थ हॅलोविनच्या निमित्ताने जस्मिनला प्रपोज करताना दिसत होता. एका फोटोत सिद्धार्थ गुडघ्यावर बसून जस्मिनला प्रपोज करताना दिसला, तर दुसऱ्या फोटोत जस्मिन सिद्धार्थसोबत तिची अंगठी फ्लाँट करताना दिसली होती.