US Protest against Presidential Election Results (Photo Credits-ANI)

US Protest against Presidential Election Results: अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रंम्प  (Donald Trump) यांचा पराभव झाल्याचे दिसून आले. तर निवडणूकीत त्यांच्या विरोधात उभे असलेले डेमोक्रेटिक पक्षाचे जो बिडेन (Joe Biden) यांचा निवडणूक विजय झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र निवडणूकीचे निकाल जाहीर झाले तरीही डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा पराभव मान्यच नाही आहे. याच पार्श्वभुवीर आता वॉशिंग्टन डीसी मध्ये डोनाल्ड ट्रंम्प यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.(Jerusalem Municipality offers Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना येरुशलम महानगरपालिकेची ऑफर, 'काळजी करु नका आमच्याकडे या')

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्प यांच्यावर जानेवारी महिन्यात नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह त्यांच्या टीमला सत्ता देण्याकरिता आता दबाब निर्माण झाला आहे. जनरल सर्विसेस अॅडमिनिस्ट्रेटन (जीएसए) वर बिडेन यांना राष्ट्रध्यक्ष पद अधिकृत रित्या सोपवण्याची जबाबदारी आहे. त्यानंतर सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेला आरंभ होणार आहे. एजेंसीच्या प्रशासक एमिली मर्फी यांच्याकडून आतापर्यंत या प्रक्रियेला आरंभ करण्यात आलेला नाही. तर एमिली यांची नियुक्ती डोनाल्ड ट्रंम्प यांनी केली होती.(US Presidential Election 2020: डेमोक्रॅटीक पक्षाचे Joe Biden असणार अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष; 20 जानेवारी 2021 ला स्विकारणार पदभार)

दरम्यान, गेल्या सोमवारी ट्रंम्प यांनी ट्विट करत असे म्हटले होते की, फॉक्स न्यूज, क्विनिपियाक पोल, एबीसी/वॉशिंग्टन पोस्ट, एनबीसी/वॉल स्ट्रिट जर्नल यांचे पोल ऐवढेच चुकीचे होते की, त्याचा वास्तवातील निवडणूकीत प्रभाव पडला गेला. पुढे त्यांनी असे ही म्हटले की, त्यांनी आपल्या निवडणूकीच्या पोल मध्ये दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे निवडणूकीत हस्तक्षेप केल्याने त्यांना बोलावले जावे.