First Black Defence Seceratry Appointed in US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांच्याकडून संरक्षण मंत्री पदावर कृष्णवर्णीय Lloyd Austin यांची निवड
Joe Biden, Lloyd Austin | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडन (Joe Biden) यांनी देशाच्या संरक्षण मंत्री (Defence Seceraty) पदावर सेवानिवृत्त जनरल लॉयड ऑस्टिन (Retired General Lloyd Austin) यांची निवड केली आहे. जनरल लॉयड ऑस्टिन हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय संरक्षणमंत्री असतील. जनरल लॉयड ऑस्टिन हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये मिडिल ईस्ट ममध्ये अमेरिकी सैन्यावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी पार पाडत होते.

अमेरिकी सैन्यातून सन 2016 मध्ये सेंट्रल कमांड पदावरुन सेवानिवृत्त होणाऱ्या जनरल ऑस्टिन यांना बायडेन विजयी झाल्यापासू संरक्षण मंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. लॉयड ऑस्टिन यांचे नाव काही प्रगत समुहाकडून टीकेचा विषय होऊ शकतो. कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर ऑस्टिन यांनी एका शस्त्र बनविणाऱ्या रेथियॉन टेक्नोलॉजीज कार्पोरेशन कंपनीसह इतरही अशाच प्रकारच्या काही उद्योगात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. (हेही वाचा, Hari Shukla, 87 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीचा युकेच्या Newcastle Hospital मध्ये प्रथम Pfizer-BioNTech ची कोविड 19 लस मिळणार्‍यांच्या यादीत समावेश)

रॉयटर या वृत्तसंस्थेने म्हटलेआहे की, ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती राहिलेल्या बायडन आणि ऑस्टीन यांच्यात नेहमीच दोस्ती राहिली. नेहमीच्या कामातून दोघांमध्ये उत्तम संवाद निर्माण झाला. सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते संरक्षण विषयक मुद्द्यांवर बायडेन यांना सल्ला देत होते.

दरम्यान, ऑस्टिन यांच्या रुपात अमेरिकेला पहिले कृष्णवर्णीय संरक्षणमंत्री देण्याचा निर्णय बायडन यांच्या वैविध्याला पुष्टी देणार आहे. या निर्णयामुळे अमेरिकी सैन्यदलात एक सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास व्यक्त केला जाता आहे.

ऑस्टीन यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य असे की, त्यांना प्रसारमाध्यमांतून चर्चेत राहण्यात विशेष रुची नाही. परंतू, त्यांना अमेरिकेच्या सैन्य दलाचे अभ्यासक आणि निष्णात, चतूर रणनितीकार म्हणून ओळखले जाते.