
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प (Donald trump) यांनी डेमोक्रेटिक पक्षातून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे असलेले जो बिडेन (Joe Biden) यांनी केलेल्या लेखावर बंदी घालण्यासाठी फेसबुक आणि ट्विटरवरुन त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. न्यूयॉर्क पोस्ट यांनी बुधवारी ईमेल्स यांचा संदर्भ देत बातम्यांची एक सीरिज प्रकाशित केली होती. त्यात कथित रुपात बिडेन यांच्या मुलाने पाठवली होती. एनपीआर डॉट ओआरजीच्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीत असा दावा केला गेला आहे की, त्यांना हा मेल ट्रंम्प यांचा खासगी वकिल रुडी गिउलिआनी आणि ट्रंम्प यांचे माजी सल्लागार स्टीव बॅनन यांच्याकडून मिळाले आहे.
क्राउडटेंगल यांच्या आकडेवारीनुसार, फेसबुकने ही पोस्ट व्हायरल होऊ नये म्हणून त्यावर बंदी घातली. पण त्याला काहीच वेळात तब्बल 6 लाख वेळा फेसबुकवर लाईक्स आणि शेअर करण्यासह कमेंट्स सुद्धा केल्या गेल्या आहेत. तर ट्विटरने एक अजब पाऊल उचल युजर्सला न्यू यॉर्क पोस्टची स्टोरीचे मेल किंवा फोटोसह लिंक पोस्ट करण्यावर बंदी घातली आहे. त्याचसोबत असा ही संदर्भ दिला आहे की, हँकिंगच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या खासगी माहितीची पुष्टी करणे हे आमच्या नियमांच्या विरुद्ध आहे.(US President Donald Trump यांच्या ब्लॅक समर्थकांचे फेक अकाऊंट्स ट्विटरकडून बॅन)
ट्विटरने असे म्हटले आहे की, लेखामध्ये असलेली चित्रांत व्यक्तीगत आणि खासगी माहिती दिली आहे. जसे ईमेल आणि फोन क्रमांक अशा गोष्टी आहेत. अशा माहितीची पुष्टी करणे आमच्या नियमांच्या विरुद्ध आहे. दरम्यान ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी स्विकार केले की कंपनीने यावर बंदी घालण्यासंबिधत केलेला संवाद हा योग्य नव्हता. त्यांनी ट्विट केले की, न्यूयॉर्क पोस्टच्या विरोधात जे पाऊल उचलले गेले ते योग्य नव्हते.
फेसबुक आणि ट्विटरवरील कारवाईमुळे अमेरिकेतील राजकरणात खळबळ उडाली आहे. यावरुन ट्रंम्प यांनी ट्विट केले की, हे ऐवढे भयंकर होते की ट्विटर आणि फेसबुकला त्यावर बंदी घालावी लागली. तर ट्विटर आणि फेसबुकवर निवडणूकीसंधित काही खोट्या माहिती आणि दाव्यांसह अन्य काही गोष्टी पोस्टवर बंदी घालण्यासाठी काही पावले सुद्धा उचलली जात आहेत.