अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांची कोरोना व्हायरस संदर्भात पत्रकार परिषद (Coronavirus Briefing) सुरु असताना व्हाईट हाऊसबाहेर (White House) गोळीबार झाला. गोळीबार होताच तिथे उपस्थित सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटसनी (Secret Service Agent) ट्रम्प यांना व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातून बाहेर नेले आणि या घटनेची माहिती दिली. तसंच गोळीबार नियंत्रणात असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर ट्रम्प यांनी ब्रिफिंग रुममधून बाहेर पडले.
बाहेर प्रत्यक्ष गोळीबार सुरु असून त्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे ट्रम्प यांनी ब्रिफींग रुममध्ये परत आल्यावर सांगितले. तसंच कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे हा गोळीबार करण्यात आला असून तो संशयित होता, असेही ट्रम्प म्हणाले. (अमेरिकेमध्ये TikTok, WeChat वर बंदी; US President Donald Trump प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्याला 45 दिवसांची मुदत)
ANI Tweet:
#WATCH US: Secret Service agents escorted President Donald Trump out of White House briefing room shortly after the start of a news conference.
After returning to the news conference, President Trump informed reporters that there was a shooting outside the White House. pic.twitter.com/msZou6buGP
— ANI (@ANI) August 10, 2020
या घटनेनंतर व्हाईट हाऊस परिसरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. गोळीबार व्हाईट हाऊसच्या एक ब्लॉक सोडून 17 स्ट्रीट आणि पेन्सल्व्हेनिया अव्हेन्यू येथे झाला. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पोलिस अधिकारी या घटनेमागील उद्देशाचा तपास करत आहेत.
संशयित जखमीला जवळच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. पण त्याच्या प्रकृतीची माहिती अद्याप हाती आलेली नाही. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी या कामाबद्दल सिक्रेट सर्व्हीस एजंटसचे कौतुक केले आहे.