US Human Trafficking Case: मानवी तस्करी(Human Trafficking)प्रकरणात चार भारतीयांना ( Indian Couple)अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. टेक्सासमधील प्रिन्स्टन येथील एका घरात 15Mमहिला राहत असल्याचे आढळल्यानंतर अटकेच सत्र पार पडलं. प्रिन्स्टन पोलिसांनी सोमवारी, 8 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, महिलांना प्रोग्रामिंग शेल कंपन्यांसाठी काम करण्यास भाग पाडले गेले होते.
फॉक्स 4 च्या अहवालानुसार, जेव्हा कीटक नियंत्रण कंपनीला या जोडप्याच्या घरी साफसफाईचेकाम करण्यासाठी बोलावण्यात आले, तेव्हा त्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही घटना आली. त्या घरात प्रत्येक खोलीत 3-5 स्त्रिया अत्यंत बिकट परिस्थितीत राहत होत्या. घरात फर्निचर नसल्याने महिलांना जमिनीवर झोपावे लागायचे. कंपनी कर्मचाऱ्यांनी प्रिन्स्टन पोलिसांना घरातील परिस्थितीची माहिती दिली.
एनआरआय संतोष काटकूरी विरुद्ध सर्च वॉरंट बजावल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. शोधादरम्यान, अधिकाऱ्यांना संतोष काटकूरी (31), त्याची पत्नी द्वारका गुंडा (31), मेलिसा येथील चंदन दासिरेड्डी (24) आणि अनिल माले (37) या संशयितांनी 15 महिलांना घरात बळजबरीने घरात ठेवले होते. अधिकाऱ्यांनी महिलांचे तपशील उघड केलेले नाहीत. या टोळीसाठी शेकडो पीडितांना काम करायला लावल्याचा संशय आहे. प्रिन्स्टन पोलीस पुढे म्हणाले की, "मी कदाचित 100 पेक्षा जास्त जणांची माहिती सांगू शकतो."
हैदराबाद मेलने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स्टनचे पोलीस प्रमुख जेम्स वॉटर्स यांनी सांगितले की, त्यांची टीम अनेक महिन्यांपासून फेडरल अन्वेषकांसोबत काम करत आहे.