Afghanistan: अमेरिकेने दिले काबूल विमानतळ हल्ल्याचे प्रतिउत्तर, इस्लामिक स्टेटच्या ठिकाणी केले एअर स्ट्राइक
Airstrike. (Photo Credits: IANS)

Afghanistan:  अफगाणिस्तान मध्ये काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याचे आता अमेरिकेने (US) प्रतिउत्तर दिले आहे, अमेरिकेने इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे. पेंटागन यांनी जाहीर केलेल्या विधानात असे म्हटले आहे की, काबुल विमानतळावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळेच अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे किती नुकसान झाले याबद्दल कोणताही माहिती समोर आलेली नाही. असे सांगितले जात आहे की, अमेरिकेने हा एअर स्ट्राइक शनिवारी पहाटेच्या वेळी केला. हल्ल्यानंतर पेंटागन यांनी स्वत: याबद्दल विधान जाहीर केले आहे. अमेरिकेने अशावेळी हा हल्ला केला आहे की, अफगाणिस्तानमध्ये त्यांचे नागरिक अडकले गेले आहेत.

काबुल हल्ल्याला उत्तर देत अमेरिकेच्या सेनेने अफगाणिस्तान मध्ये IS दहशतवाद्यांच्या विरोधात एअर स्ट्राइक केले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ड्रोनच्या माध्यमातून ISISI-K च्या ठिकाणांवर अमेरिकेच्या सेनेकडून एअर स्ट्राइक करण्यात आला आहे. असा दावा केला जात आहे की, अमेरिकेच्या सेनेने काबुल हल्ल्याच्या सुत्रधार याचा सुद्धा खात्मा केला आहे. युएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांन विधान जाहीर करत असे म्हटले की, अमेरिकेच्या सैन्याने एक ISISI-K प्लानरच्या विरोधात दहतवादी विरोधी अभियान केले. इस्लामिक स्टेट खुरासनने काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.(Afghanistan-Taliban Conflict: काबूल विमानतळावर स्फोट घडवून आणणाऱ्यांना अमेरिका माफ करणार नाही, अध्यक्ष बिडेन यांनी केले वक्तव्य)

Tweet:

पेंटागनचे प्रवक्ता जॉन किर्बी यांनी असे म्हटले की, अमेरिकेच्या गुप्तचर एजेंसीला ज्या पद्धतीने इनपुट मिळाले आहेत त्यावरुन स्पष्ट होते की, काबुल विमानतळावर कधीही दहशतावादी हल्ले केले जाऊ शकतात. आम्ही निश्चित रुपाने या धोक्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. त्याचसोबत अमेरिकेच्या सैन्याला सुद्धा अलर्ट करण्यात आले  आहे. मंगळवार पर्यंत अफगाणिस्तान मधून सर्व अमेरिकेच्या सैन्याला मायदेशी परत बोलावण्यापूर्वी हल्ल्याची शक्यता पाहता त्यांची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे.