US: 5 वी सह उच्च शिक्षण देणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना द्यावे लागणार मोफत कंडोम, शिकागो मधील शाळांसाठी नवा नियम लागू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

US: कोरोनाची परिस्थिती काही ठिकाणी हळूहळू कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा विचार केला जात आहे. अशातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर अमेरिकेतील शिकागो (Chicago) मध्ये असा एक आदेश पारित करण्यात आला आहे ज्यामुळे सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार शिकागो मधील शाळांसाठी एक नवी पॉलिसी सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 5 वी पर्यंत किंवा त्याहून उच्च शिक्षण देणाऱ्या शाळांनी विद्यार्थ्यांना मोफत कंडोम देण्याची व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे.

नव्या पॉलिसीनुसार, शाळेतील 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी कंडोमची व्यवस्था करावी. या आदेशानंतर सोशल मीडियात काहींना संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची पालकांनी हा नियम लज्जास्पद आणि ढासळलेली मानसिकता असल्याचे म्हटले आहे. Fox News नुसार, नवी पॉलिसी डिसेंबर 2020 पासून लागू होणार होती. मात्र कोरोनाच्या परिस्थिती मुळे शाळा बंद असल्याने ती लागू केली नाही. या नव्या पॉलिसीमध्ये 5 वी किंवा त्याहून अधिक इयत्तेमधील विद्यार्थ्यांना कंडोम उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यक्रम ठेवण्यास सांगितले आहे.(Fact Check: नेदरलँडमधील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता अनिवार्य? पाहा व्हायरल होत असलेल्या माहितीमागील सत्य)

शिकागो सार्वजनिक शाळेने असे म्हटले की, विद्यार्थ्यांदरम्यान एचआयवी संक्रमण आणि अनवॉन्टेड प्रेग्नसीसह यौन संचारित रोगांचा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे कंडोम फ्री मध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. शिकागो सन-टाइम्ससह एका बातमीत सीपीएसच्या मुख्य चिकित्सक केनेथ फॉक्स यांनी स्विकारले आहे की, या निर्णयामुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.

शिकागो पब्लिक स्कूल सिस्टिममध्ये 600 हून अधिक शाळा आहेत. ज्यामध्ये बहुतांश शाळा 5 वी वरील शिक्षण देतात. फॉक्सने म्हटले की, पुढील महिन्यापासून 600 सीपीएस शाळांना हजारो कंडोम्स दिले जाणार आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळांना 250 कंडोम आणि हायस्कूलला 1 हजार कंडोम दिले जाणार आहेत. या नव्या पॉलिसीमुळे सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेतच. पण काही लोकांनी आश्चर्य आणि नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे.