कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी भारताला अमेरिका व्हेंटिलेटर, लसीच्या विकासासाठी मदत करणार- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
US President Donald Trump (Photo Credits: Getty Images)

अमेरिका (US) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी भारताला (India) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प भारताला व्हेंटिलेटर आणि कोरोनावरील लसीच्या विकासासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, मला घोषणा करताना आनंद होत आहे असून अमेरिका मित्र असलेल्या भारताला व्हेंटिलेटर दान करणार आहे. या महासंकटाच्या काळात भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या सोबत असल्याचे ही ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच लसीच्या विकासासाठी सुद्धा सहकार्य करणार आहे. आम्ही मिळून या अदृश्य शत्रुला हरवणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी भारताने कोविड19 च्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेला मदतीचा हात पुढे करत हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध दिले होते. अमेरिकेत कोरोनाचे संक्रमण आणि बळींचा आकडा सर्वाधित आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 87 हजार जणांचा मृत्यू झाला असून 14 लाख लोकांना त्याचे संक्रमण झाले आहे. अमेरिकेत नागरिकांकडून लॉकडाउन हटवण्यासाठी आंदोलने केली गेल्याचे दिसून आले होते. तसेच अमेरिका वारंवार चीनवर निशाणा साधत असून त्यांनीच कोरोनाची उत्पत्ती केल्याचा आरोप लगावत आहे.(Coronavirus: चीन सोबत सर्व संबंध तोडून टाकण्याचे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची क्षी जिनपिंग यांना अप्रत्यक्ष धमकी)

भारताबाबत बोलायचे झाल्यास कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता चीनला मागे टाकले आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील कोरोनाची आकडेवारी पाहता ती 85 हजारांच्या पार गेली आहे. भारतात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनचे आदेश जाहीर केले आहेत.