Ukraine Helicopter Crash: हेलिकॉप्टर अपघातात युक्रेनच्या गृहमंत्र्यासंह 18 जण ठार
Ukraine Helicopter Crash | (Photo Credits: Twitter)

हेलिकॉप्टर अपघातात (Ukraine Helicopter Crash) युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह 18 जणांचा मृत्य झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) अत्यंतिक प्रभाव राहिलेल्या कीव (Kyiv City) शहराच्या उपनगरात बुधवारी (18 जानेवारी) सकाळी एका नर्सरीजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये युक्रेनच्या वरीष्ठ मंत्रालयांतील अधिकाऱ्यांसह तीन मुलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. युक्रेनचे राष्ट्रीय पोलिस प्रमुख इहोर क्लायमेन्को (Ihor Klymenko) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की (Denys Monastyrskyi) , त्यांचे उप येव्हेन येनिन आणि अंतर्गत व्यवहार मंत्रालयाचे राज्य सचिव युरी लुबकोविच ( Yurii Lubkovych ) यांचा समावेश आहे.

युक्रेन रशिया यांच्यात पाठिमागील 11 महिन्यांपासून सुरु झालेल्या युद्धापासून आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी मोनास्टिर्स्की हे सर्वात वरिष्ठ युक्रेनियन अधिकारी आहेत. युक्रेनचे प्रादेशिक गव्हर्नर म्हणाले की, राजधानीच्या ईशान्य बाहेरील ब्रोव्हरी येथील निवासी भागात हेलिकॉप्टर खाली आल्याने 15 मुलांसह 29 जण जखमी झाले.

ट्विट

खराब झालेल्या नर्सरीजवळील अंगणात फॉइल ब्लँकेटमध्ये लपेटलेले अनेक मृतदेह पडले आहेत. आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी होते. खेळाच्या मैदानावर मलबा पसरला होता. आपत्कालीन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील अधिकारी आणि मंत्र्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.