Vijay Mallya | (Photo Credit - Twitter/ANI)

थकलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला उद्योगपती विजय माल्या (Vijay Mallya) याच्यावर लंडन (London) येथील आलिशान घरातूनही बेदखल होण्याचीही वेळ येण्याची शक्यता आहे. लंडन येथील आलीशान (Vijay Mallya Luxury Home in London) घरातून बेदखल करण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी विजय माल्या याने कोर्टात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज इंग्लंडच्या कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावला आहे. स्विस बँक यूबीएस सोबत प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या वादात विजय माल्या याचे घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. माल्याने या आदेशाचे अनुपालन होण्यास स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती.

विजय माल्या सध्या लंडन येथील रीजेंट पार्क मध्ये 18/19 कॉर्नवाल टेरेस लक्जरी अपार्टमेंट येथे त्याच्या 95 वर्षीय आई ललीता यांच्यासोबत राहतो. लाखो पाऊंड किमतीची मौल्यवान संपत्ती असा या संपत्तीचा न्यायालयात उल्लेख करण्यात आला आहे. लंडनच्या हायकोर्टाच्या चांसरी डिव्हीजनचे न्यायाधीश मॅथ्यू मार्श यांनी आपल्या निर्णयात म्हटले की, माल्या परिवाराला आपल्या संपत्तीचा भरना करण्यासाठी वेळ वाढवून देण्यास कोणतेही सबळ कारण नाही. याचा अर्थ असा की, माल्या याला आपल्या संपत्तीतून बेदखल करण्यात यावे. (हेही वाचा, Vijay Mallya, Nirav Modi, Mehul Choksi Assets: विजय माल्या, निरव मोदी, मोहुल चौक्सी यांच्यावर ED ची कारवाई; 9,371 कोटी रुपयांची संपत्ती बँकांकडे हस्तांतरीत)

ट्विट

माल्या याला स्विस बँकेला 2.04 कोटी पाउंड इतके कर्ज परत करायचे आहे. त्याच्यासोबत लंडन येथील घरात त्याची 95 वर्षांची आई राहते. विजय माल्या मार्च 2016 पासून इंग्लंडमध्ये राहोत. तो आपल्या बंद झालेल्या किंगफिशर एअरलाईन्सशी संबंधीत 9,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक बँक कर्ज थकीत प्रकरणी (Bank Fraud Case) आरोपी आहे. फरार विजय माल्या याच्याशी संबंधित अवमानना प्रकरणात उच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी टळली. 9 मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने माल्या याला कोर्टाच्या अवमानना प्रकरणात दोषी धरले होते. कारण त्याने संपत्तीचा पूर्ण तपशील दिला नव्हता.