आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर देशात जोरदार निषेध होत आहे. आता या निषेधानंतर पाकिस्तानमध्ये ट्विटर ब्लॉक करण्यात आल्याची माहिती आहे. हिंसक निदर्शनांदरम्यान सरकारने इंटरनेटवरही बंदी घातल्याचे अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानच्या विविध भागात ट्विटर चालत नसल्याचे सोशल मिडियावर म्हटले आहे. पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायिक संकुलातून रेंजर्सच्या कर्मचार्यांनी अटक केल्याच्या विरोधात, पक्ष नेतृत्वाने देशव्यापी निषेध पुकारल्यानंतर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे कार्यकर्ते मंगळवारी रस्त्यावर उतरले. माजी पंतप्रधानांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: Imran Khan Arrest Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, पाहा व्हिडिओ)
#BREAKING: Twitter access blocked in Pakistan. Internet likely to be blocked likely soon tonight.
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 9, 2023
Twitter shut down in various parts of Pakistan. Using a workaround to post this tweet.
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) May 9, 2023
Could you confirm if Twitter is down in Pakistan? @elonmusk
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) May 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)