TikTok Threatens Legal Action Against US President Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाच्या विरोधात TikTok ने दिली कोर्टात जाण्याची धमकी
प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: Pexels)

अमेरिका (US) आणि चीन (China) यांच्यामध्ये तणतण अद्याप सुरुच आहे. तसेच अमेरिका नेहमीच आपला दबदबा चीनवर राहिल याचा प्रयत्न करतो. याच दरम्यान आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार, चीनची मूळ कंपनी ByteDance सोशल मीडिया अॅप टिकटॉकची (TikTok) विक्री न केल्यास त्याचे संचालन 45 दिवसात बंद करावे. अमेरिकेच्या या कार्यकारी आदेशानंतर चीनच्या व्हिडिओ अॅपने म्हणजेच टिकटॉकने डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी दिली आहे. टिकटॉकने म्हटले की, आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. तसेच हे सुनिश्चित करण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व उपायांचे पालन करणार आहोत. त्यामुळे कायद्याचे योग्य पद्धतीने पालन केले जाईल.

टिकटॉकने असे म्हटले आहे की, आमची कंपनी आणि युजर्ससोबत योग्य व्यवहार करतात. असे असून सुद्धा सरकारच्या वतीने असे न झाल्यास आम्ही कोर्टाचा आधार घ्यावा लागणार आहे. खरंतर या गोंधळाचे कारण स्पष्ट झाले आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणतीही कंपनी न विकल्याबद्दल देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत दिली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे.(अमेरिकेमध्ये TikTok, WeChat वर बंदी; US President Donald Trump प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्याला 45 दिवसांची मुदत) 

दरम्यान, भारतात टिकटॉक आणि व्हि चॅट सारख्या अॅपवर बंदी घालण्यात येणारा पहिला देश आहे. भारताने राष्ट्रीय सुरक्षा संबंधित चिंताबद्दल हवाला देत ही बंदी घातली आहे. भारताने 106 चीनी अॅपवर बंदी घातली आहे. भारताचा या निर्णयाचे ट्रम्प प्रशासनाने आणि अमेरिकेच्या नेतेमंडळींनी स्वागत केले होते. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशात असे म्हटले होते की, अमेरिकेला आपल्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी टिकटॉक मालकांच्या विरोधात आक्रमक कारवाई केली पाहिजे. तसेच टिकटॉसह व्हि-चॅटवर ही कारवाई करण्यात यावी असे ही ट्रम्प यांनी म्हटले होते.