Elon Musk Postpones India Trip: टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलला, पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर करणार होते अनेक घोषणा
Elon Musk Postpones India Trip (PC - X/@cb_doge)

Elon Musk Postpones India Trip: टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी त्यांचा नियोजित भारत दौरा (India Trip) पुढे ढकलला आहे. येत्या सोमवारी मस्क यांनी पंतप्रधान मोदींना (PM Modi) भेटण्याची योजना आखली होती. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मस्क भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या अनेक योजनांची घोषणा करणार होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी आपला दौरा का पुढे ढकलला हे अद्याप कळू शकलेले नाही. यासंदर्भात टेस्ला आणि पीएम मोदींकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

स्वत: मस्क यांनी भारतात न येण्याचे कारण पोस्ट केले आहे. ते म्हणाले की, टेस्लाच्या काही महत्त्वाच्या कामांमुळे मी भारतात येऊ शकणार नाही, पण या वर्षाच्या शेवटी दौऱ्याची वाट पाहत आहे. (हेही वाचा -Starlink Internet in India: एलोन मस्ककडून भारतासाठी खास भेट? स्टारलिंक देऊ शकतो देशात स्वस्त इंटरनेट)

दोन आठवड्यांपूर्वीच मस्कने स्वतः X वर पोस्ट करून भारतात येण्याच्या प्लॅनबद्दल सांगितले होते. मस्क यांनीही पंतप्रधान मोदींना भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली होती. या बैठकीनंतर मस्क भारतीय बाजाराबाबत अनेक मोठ्या घोषणाही करणार होते.

मस्क यांच्या भारत भेटीमागील कारण त्यांच्या टेस्ला कंपनीने भारतात प्लांट उभारण्याच्या शक्यतेवर आधारित होते. अनेक अहवालांनुसार, मस्कने भारतात कारखाना सुरू करण्यासाठी $3 अब्जपर्यंत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.