Nepal Tara Air Crash: सहा तासांनंतर सापडले तारा एअरचे विमान; 4 भारतीयांसह 22 प्रवाशांचा होता समावेश
Missing Nepal aircraft (PC - ANI)

Nepal Tara Air Crash: नेपाळमधील प्रवाशांनी भरलेल्या बेपत्ता विमानाचा लष्कराने शोध घेतला आहे. हिमालयातील मानापथीच्या खालच्या भागात हे विमान दिसल्याची माहिती नेपाळ लष्कराने दिली आहे. त्याचवेळी मुस्तांग (Mustang) च्या कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडले. 19 आसनी या विमानात 4 भारतीय, 3 परदेशी आणि 13 नेपाळी नागरिक होते. मात्र, विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की, नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला. त्यानंतर विमानाचा शोध घेण्यात आला. खराब हवामानामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने लष्कराला बचावकार्य कठीण जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुस्तांगमधील कोबानजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. (हेही वाचा - Nepal Flight Missing: चार भारतीय आणि 22 प्रवाशांसह नेपाळचे विमान बेपत्ता, ट्रॅफीक कंट्रोलसोबत संपर्क तूटला-सूत्र)

बेपत्ता विमानाचा शोध लागला असल्याची माहिती नेपाळ लष्कराकडून मिळाली आहे. विमान मानापथीच्या खालच्या भागात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, विमानाची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हेही कळू शकलेले नाही. लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, हिमालयाच्या खालच्या भागात असलेल्या मनापथी येथे भूस्खलनामुळे तारा एअरचे विमान लामचे नदीवर कोसळले होते. नेपाळी सैन्य जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे.

नेपाळ लष्कराच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, या विमानाने सकाळी 10 वाजता पोखरा येथून उड्डाण केले. विमानात जास्त इंधन शिल्लक नसण्याची दाट भीती आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची भीती लष्कराच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. विमानाने जोमसोम हिल टाउनसाठी 15 मिनिटांचे नियोजित उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानतळाच्या टॉवरशी संपर्क तुटला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाऊस पडत आहे. नेपाळ लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, खराब हवामानामुळे बचाव कार्यात विलंब आणि अडचणी येत आहेत.

दरम्यान, नेपाळमधील तारा एअरच्या विमानाचा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर पाच मिनिटांतच संपर्क तुटला. त्यात 19 प्रवासी होते. तीन क्रू मेंबर्सही होते. बेपत्ता विमानात चार भारतीय, तीन जपानी आणि बाकी सर्व नेपाळी नागरिक होते. विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने पोखराहून जोमसोमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण केले.