तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून देशात अनेक नवे निर्बंध लागू केले जात आहेत. विशेषतः स्त्रियांवरील बंधने वाढत आहेत. अशात तालिबानने मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानातील सर्व ब्युटी सलून एक महिन्याची मुदत संपल्यामुळे बंद होणे आवश्यक आहे. या आदेशाला मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक विरोध होत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानचे शासन हे अफगाण महिला आणि मुलींच्या अधिकारांवर आणि स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. महिलांना शिक्षण, सार्वजनिक जागा आणि बहुतेक प्रकारच्या रोजगारापासून प्रतिबंधित केले गेले आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून, महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांचे चेहरे झाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना पार्क आणि जिममध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना हायस्कूल आणि युनिव्हर्सिटी आणि पुरुष नातेवाईकाशिवाय लांब पल्ल्याच्या रस्त्यावर प्रवास करण्यास देखील बंदी आहे. याशिवाय, अफगाणिस्तानातील महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय विमानात जाण्यास बंदी आहे. (हेही वाचा: Anju Weds Nasrullah: भारतीय महिला अंजूने पाकिस्तानमध्ये केले नसरुल्लाहशी लग्न; स्वीकारला इस्लाम, नवीन बदललेले नाव 'फातिमा', Watch Video)
जाणून घ्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर घातले गेलेले निर्बंध-
Since the Taliban took control of Afghanistan, women have been:
- Ordered to cover their face in public
- Banned from visiting parks and gyms
- Banned from high school and university
- Banned from long-distance road travel without a male relative
- Banned from planes without a…
— BNO News (@BNONews) July 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)