Anju Weds Nasrullah: भारतीय महिला अंजूने पाकिस्तानमध्ये केले नसरुल्लाहशी लग्न; स्वीकारला इस्लाम, नवीन बदललेले नाव 'फातिमा', Watch Video
मंगळवारी (25 जुलै) दोघांच्या लग्नाचा व्हिडिओही समोर आला आहे. पाकिस्तानमधील जिल्हा न्यायालयात अंजू आणि नसरुल्ला यांचा विवाह झाला. लग्नानंतर अंजूने सांगितले की, ती खूप आनंदी आहे.
भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर सध्या खूप चर्चेत आहे. आता असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. भारतामधून अंजू (Anju) नावाची महिला आपल्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेली आहे. आता भारतातून पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूने तिचा ऑनलाईन मित्र नसरुल्लाहसोबत लग्न केले आहे. यासाठी अंजूने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला. तिचे नवीन इस्लामिक नाव फातिमा असे असेल.
मंगळवारी (25 जुलै) दोघांच्या लग्नाचा व्हिडिओही समोर आला आहे. पाकिस्तानमधील जिल्हा न्यायालयात अंजू आणि नसरुल्ला यांचा विवाह झाला. लग्नानंतर अंजूने सांगितले की, ती खूप आनंदी आहे. अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला आणि ती राजस्थानमधील अलवरमध्ये राहते. नसरुल्ला आणि अंजू 2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मित्र झाले. आता नसरुल्लाला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानमध्ये गेली आहे.
काल नसरुल्लाहने अंजूशी प्रेमसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आणि सांगितले की, तिच्याशी लग्न करण्याचा आपला कोणताही विचार नाही. तसेच अंजू 20 ऑगस्टला तिचा व्हिसा संपल्यानंतर भारतामध्ये परतेल असेही तो म्हणाला होता. मात्र आज या दोघांचा लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. अंजू पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर दीर या आदिवासी जिल्ह्यात नसरुल्लाला भेटण्यासाठी गेली आहे. अंजू आधीच विवाहित असून तिला दोन मुले आहेत. अंजूला 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे.
PNN News: Indian woman, 'Anju' who travelled to meet her Pakistani lover, Nasrullah, has converted to Islam and married her lover. She has now been renamed Fatima.
- The couple also released a video titled ‘Anju weds Nasrullah’. It shows them visiting scenic mountainous spot and… pic.twitter.com/1el86BwZEv
— PNN News (@pnnnewspk) July 25, 2023
अंजूचा पती अरविंद राजस्थानमध्ये राहतो. अंजू लवकरच परत येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अरविंदने सांगितले होते की, गुरुवारी पत्नी जयपूरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती, मात्र नंतर ती पाकिस्तानात पोहोचल्याचे कुटुंबीयांना समजले. ती पाकिस्तानला का गेली व तिला व्हिसा कसा मिळाला याबाबत कुटुंबियांना काहीच नाहीती नव्हती. (हेही वाचा: Porn Videos of Girl Students: पाकिस्तानचे Islamia University बनला ड्रग्ज आणि सेक्सचा अड्डा; समोर आले विद्यार्थिनींचे 5,000 हून अधिक अश्लील व्हिडिओ)
Pre wedding shoot of Indian girl Anju in Pakistan. Reports says that Anju became Fatima at Pakistan
#Anju #AnjuinPakistan #Pakistan #Seema #SeemaHaidar pic.twitter.com/kmXihsEGQv
— anuj kumar singh (@sanuj42) July 25, 2023
दरम्यान, अपर डिस्ट्रिक्ट पोलीस ऑफिसर (डीपीओ) मुश्ताक खानने सांगितले की, अंजूने कायदेशीररित्या पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. तिच्याकडे काही महिन्यांपर्यंत येथे राहण्यासाठी वैध वीजा आहे. नसरुल्लाहच्या घरी ती राहत आहे व तिथे तिला सुरक्षा प्रदान केली आहे. दरम्यान, या जोडप्याने 'अंजू वेड्स नसरुल्लाह' नावाचा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये दोघे निसर्गरम्य डोंगराळ स्थळांना भेट देत आणि एकत्र निसर्गाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2023 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

