अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. कमला हॅरिस सध्या उपराष्ट्रपती आहेत. पण निवडणूकीतील पराभवामुळे आता या पदी JD Vance येणार आहे. दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांनंतर आता JD Vance यांच्या पत्नी Usha Vance चर्चेत आल्या आहे. उषा यांचे भारताशी नातं आहे. दरम्यान JD Vance यांच्या विजयानंतर भारतात आंध्रप्रदेश येथील गोदावरी मध्ये उषा यांच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला आहे. US Presidential Election Results: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा Donald Trump; PM Narendra Modi यांनी केले अभिनंदन .
अमेरिकेच्या सत्ता वर्तुळातून कमला हॅरिस बाहेर उषा वेंस यांचा प्रवेश
उषा वेंस या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचा विवाह आता उपराष्ट्रपती होणार्या JD Vance यांच्याशी झालेला आहे. उषा यांचे आई वडील लक्ष्मी आणि राधाकृष्ण चिलुकुरी हे आंध्रप्रदेशातील आहेत. कृष्णा जिल्ह्यातील पामर्रु हे त्यांचं गाव आहे. रोजगारासाठी ते अमेरिकेत गेले. दरम्यान उषा यांचं शिक्षण, लहानपण अमेरिकेच्या सॅन डिएगो मधील आहे. माउंट कार्मेस स्कूल मधून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं आहे. येल यूनिव्हर्सिटी मधून इतिहास विषयात बीए आणि कॅब्रिंज मधून आधुनिक इतिहास विषयात एमफिल केले आहे.
उषा वेंस या वकिल आहेत. येल युनिव्हर्सिटी मधून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. काही महिने त्यांनी वकीली केली. नंतर कोर्टात लिपिक म्हणून काम केले. दिवाणी खटले सोडविण्याचे त्यांचे कौशल्य आहे. मात्र, अनेक महिन्यांपासून त्या नोकरी सोडून पतीच्या प्रचारात सहभागी झाल्या आहेत.
People.com वेबसाइटनुसार, उषा वेंस सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टन डीसी येथील मुंगेर टोलेस अँड ओल्सन एलएलपी फर्ममध्ये 2015 ते 2017 या काळात काम करत होत्या. यानंतर त्यांनी 2018 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात कायदा लिपिक म्हणून काम केले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये, मुंगेर, टोलेस आणि ओल्सन एलएलपी येथे परत आल्या.
Usha Vance यांच्या गावी सेलिब्रेशन
#WATCH | Godavari, Andhra Pradesh: After #USElection2024 results, people in Vadluru village, the residential village of Usha Vance, husband of US Vice Presidential candidate JD Vance, burst crackers and celebrate. pic.twitter.com/bXr6RwvPVN
— ANI (@ANI) November 6, 2024
हिंदू पद्धतीने विवाहबद्ध
उषा यांनी 2014 मध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर वर्षभरातच जेडी वेंस यांच्यासोबत लग्न केले. अमेरिकेत केटकी प्रांतामध्ये हे लग्न झाले. या लग्नाचे विधी हिंदू पद्धतीने झाले होते. उषा आणि जेडी यांना 3 मुलं आहेत. इवान आणि विवेक ही दोन मुलं तर मिराबेल ही मुलगी आहे. जेडी कॅथलिक आहेत तर उषा हिंदू धर्म पाळतात.