Helicopter (Photo Credits: Pixabay)

एकीकडे अनेक देश कोरोना विषाणूशी लढा देत आहेत, तर दुसरीकडे अशा अनेक दुर्घटना घडत आहेत ज्यामुळे जगातील शांती भंग होत आहे. आता इस्त्राईल (Israel) आणि इजिप्त (Egypt) मधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, इजिप्तच्या सिनाई द्वीपकल्पात (Sinai Peninsula) आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापितांचे म्हणजेच शांतीदुतांचे (Peacekeepers) हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात सात शांतीदुतांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ही घटना घडली. सिनाई घटनेत मृत्यू झालेल्या लोकांमध्ये पाच अमेरिकन लोकांचा, एक फ्रेंच नागरिक आणि एका झेक नागरिकाचा समावेश आहे. हे सर्व लष्करी सेवा सदस्य असल्याचेही इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले.

इजिप्शियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे दिसून येत आहे की, काही तांत्रिक कारणांमुळे हा अपघात झाला आहे. हेलिकॉप्टर बहुराष्ट्रीय बल 'एमएफओ' चे होते, जे इस्राईल-इजिप्त शांतता करारावर नजर ठेवते. नाव न छापण्याच्या अटीवर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात माध्यमांशी बोलण्याचा दोन्ही देशांना अधिकार नाही. इस्त्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी दुर्घटनास्थळी बचाव दल पाठवण्याची ऑफर दिली होती. जखमींना वाचवण्यासाठी इस्त्रायलने प्रारंभी हेलिकॉप्टरजी पाठवले होते, परंतु मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर त्यांनी मोहीम बंद केली. (हेही वाचा: ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्ला; 7 जण ठार, तर अनेकजण जखमी)

1979 च्या इजिप्शियन-इस्त्रायली शांतता कराराअंतर्गत सिनाईच्या डिमिलीटरायझेशनवर नजर ठेवण्यासाठी एमएफओ बसविला गेला होता. मएफओच्या अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची चौकशी चालू असल्याचे सांगितले. एमएफओचे सैन्य 13 देशांमध्ये आहेः, यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, झेक प्रजासत्ताक, फिजी, फ्रान्स, इटली, जपान, न्यूझीलंड, नॉर्वे, ब्रिटन, उरुग्वे आणि अमेरिकेत सर्वात मोठा तुकडी आहे. याचे मुख्यालय रोममध्ये आहे. अलिकडच्या वर्षांत वॉशिंग्टन, एमएफओमध्ये अमेरिकेने किती प्रमाणात सहभागी व्हावे याचे मूल्यांकन करत आहे.