गरिबीने पिचलेल्या पाकिस्तानवर ओढवली नामुष्की; 500 अब्ज रुपयांच्या कर्जासाठी गहाण ठेवणार Muhammad Ali Jinnah शी संबंधित उद्यान
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Photo Credits: IANS)

आर्थिक संकटाशी झुंजणार्‍या पाकिस्तानची (Pakistan) हालत जगजाहीर आहे. पाकिस्तान सध्या चीन, संयुक्त अरब अमिराती आणि मलेशिया या देशांच्या कर्जाखाली दबून गेला आहे. आता कर्जदारही त्यांचे पैसे परत मागू लागले आहेत. अशात, पाकिस्तानचे इम्रान खान (Imran Khan) सरकार आता राजधानी इस्लामाबादमधील सर्वात मोठे पार्क गहाण ठेवून 500 अब्ज रुपयांचे कर्ज घेणार आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची परिस्थिती सध्या इतकी हलाखीची झाली आहे की, आता देशाचे संस्थापक नेते मोहम्मद अली जिन्नाशी (Muhammad Ali Jinnah) संबंधित उद्यान त्यांना गहाण ठेवावे लागत आहे. ‘फातिमा जिन्ना पार्क’ (Fatima Jinnah Park) नावाचे हे उद्यान, जिन्ना आणि त्यांची बहीण फातिमा यांना समर्पित होते.

उद्यान गहाण ठेवण्याचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, बैठक व्हिडिओ लिंकद्वारे पार पडेल, जी इम्रान खानच्या कार्यालयाच्या वतीने आयोजित केली जाईल. या प्रस्तावावर मंगळवारी चर्चा होईल. अहवालात म्हटले आहे की आर्थिक तंगीमुळे इम्रान खान सरकारने फेडरल सरकारची मालमत्ता एफ-9 पार्क गहाण ठेवेल, यामुळे त्यांना 500 अब्ज रुपये कर्ज मिळेल.

यापूर्वी पाकिस्तानमध्ये बऱ्याच मालमत्ता गहाण ठेवण्यात आल्या आहेत, परंतु जिन्ना यांच्या ओळखीशी संबंधित कोणतीही मालमत्ता तारण ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात, इस्लामाबादच्या भांडवल विकास प्राधिकरणाने यापूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतली आहे. फातिमा जिन्ना नावाचे हे उद्यान सुमारे 750 एकरात पसरलेले आहे, म्हणजे ते एखाद्या जंगलाइतके मोठे आहे. इतला मोठा एरिया असल्याने या उद्यानाची तुलना बर्‍याचदा न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कशी केली जाते. (हेही वाचा: पाकिस्तानला भारताकडून Covishield लस मिळेल अशी अपेक्षा पण 'या' कारणामुळे ती थेट मिळणार नाही)

1992 मध्ये सुरू झालेल्या या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे इथली हिरवळ होय. फातिमा पार्कमध्ये केवळ काही ठिकाणीच पुतळे आणि तत्सम मानवनिर्मित संरचना आहेत, बाकी जवळजवळ संपूर्ण पार्क झाडांनी भरलेले आहे. पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार्‍या चिनी सरकारही या उद्यानातही गुंतवणूक केली आहे. जिनपिंग सरकारकडून येथे इन्फ्रा आणि सौरऊर्जेसाठी मदत मिळाली आहे.