
ऑनलाइन शॉपिंग आणि होम डिलिव्हरीसाठी अॅमेझॉन (Amazon) ही जगातील सर्वात विश्वासार्ह कंपन्यांपैकी एक आहे. आजकाल तर अगदी खेड्यापाड्यात देखील कंपनीची पोहोच आहे. अॅमेझॉन आणि त्याच्या डिलिव्हरीबाबत आपण अनेक मजेशीर गोष्टी ऐकल्या असतील. आता अमेरिकेतील फ्लोरिडा येथील अॅमेझॉन डिलिव्हरी व्हॅन चालकाकडून एक चूक घडली आहे ज्यामुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली आहे. एका व्हायरल टिकटॉक व्हिडिओमध्ये एक महिला अॅमेझॉनच्या डिलिव्हरी व्हॅनमधून बाहेर पडताना दिसली आहे.
हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर चित्र विचित्र प्रतिक्रिया येऊ लागल्या व त्यानंतर आता कंपनीने ड्रायव्हरवर कारवाई करत त्याला कामावरून काढून टाकले आहे. हा व्हिडीओ फ्लोरिडा येथील आहे, ज्यामध्ये काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेली आणि शूज नसलेली ही महिला एका इमारतीबाहेर उभ्या असलेल्या अॅमेझॉन व्हॅनमधून लपत छपत खाली उतरताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ 24 ऑक्टोबर रोजी अपलोड करण्यात आला आहे.
🚨 | NEW: An Amazon driver in the US has been fired after this footage emerged of a woman slipping out the backdoor of his vanpic.twitter.com/Jl35P4FQqP
— News For All (@NewsForAllUK) October 29, 2021
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी ड्रायव्हरला आठवडाभरानंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आले. अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने स्थानिक मीडियाला सांगितले की, ‘हे कृत्य आमचे डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर्स आणि आणि त्यांच्या चालकांसाठी असलेल्या उच्च मानकांच्या विरोधात होते.’ अनधिकृत प्रवाशांना डिलिव्हरी वाहनांमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देणे हे कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन आहे आणि ड्रायव्हर यापुढे Amazon साठी काम करणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: Viral: सुंदर दिसण्यासाठी तरुणीने फेविकॉल लावून चिटकवल्या पापण्या, तासाभरातच चेहऱ्याचा झाली अशी अवस्था
हा व्हिडिओ पहिल्य्नंतर अनेक युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले आहे की आतमध्ये सेक्स चालू असावा तर, काहींचे म्हणणे आहे की, या महिलेला लिफ्ट दिली गेली असावी. दरम्यान, काही काळापूर्वी, अॅमेझॉन डिलिव्हरी बॉयला महिलेचा पेहराव करून लूमध्ये महिला आणि मुलींचे फोटो क्लिक केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. अधिकार्यांनी जेव्हा त्याचा फोन जप्त केला तेव्हा त्यांना 8 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे फोटो सापडले.