(Photo Credits: Official Website)

Samsung Labor Strike: वेतन वाढीच्या चर्चांवर (Wage Negotiation)तोडगा निघत नसल्याच्या कारणामुळे आणि कंपनीकडून अपूरी वेतनवाढ देण्यात असल्याच्या कारणामुळे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या संघटीत कामगारांनी बुधवारी संपावर (Samsung Labor Strike) जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबाबतचा विचार त्यांनी केला आहे. अपुऱ्या वेतन वाढीमुळे कामगारांनी कंपनी विरोधात बंड पुकरले आहे. दक्षिण कोरियन टेक जायंटचे व्यवस्थापन आणि कंपनीच्या युनियनमध्ये जानेवारीपासून कामगारांच्या वेतन वाढीबाबत बोलणी सुरू आहे. अनेकवेळा त्यावर चर्चासत्र पार पडले. मात्र, कंपनी कमी वेतन वाढ करत असून कामगारांनी त्यात आणखी वाढ करावी अशी मागणी केली आहे. मात्र,चर्चा अयशस्वी झाल्या आहेत. (हेही वाचा: TikTok Layoffs: टिकटॉक कंपनीमध्ये टाळेबंदीची घोषणा; 1,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी - रिपोर्ट )

योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, याआधी दक्षिण कोरियन टेक जायंटचे व्यवस्थापन आणि कंपनीच्या युनियनमध्ये चर्चा सुरू असताना मतभेद झाल्यामुळे युनियनने प्रथम वॉकआउट केले होते. व्यवस्थापनाकडून कामगारांची अवहेलना करण्याच्या वृत्तीमुळे आम्ही संप जाहीर करतो, असे कामगार संघटनेने म्हटले आहे.