Russia Ukraine War (फोटो सौजन्य - ANI)

Russia Ukraine War: युक्रेन (Ukraine) च्या सुमी (Sumy) शहरात रशियाने (Russia) मोठा प्राणघातक हल्ला केला आहे. रशियाच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात (Ballistic Missile Attack) 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

युक्रेनियन शहराच्या कार्यवाहक महापौरांनी रविवारी रशियाने केलेल्या या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली. रविवारी 'पाम संडे' साजरा करण्यासाठी स्थानिक रहिवासी जमले होते, तेव्हा रशियाने घातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यामुळे या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. (हेही वाचा -Russia-Ukraine Ceasefire: रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता; Donald Trump आणि Vladimir Putin यांच्यात झाली फोनवरून चर्चा)

महापौर आर्टेम कोबझार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'रविवारी आपल्या लोकांना एक भयानक दुर्घटना सहन करावी लागली. दुर्दैवाने 20 हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला. तथापी, शनिवारी रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांनी एकमेकांवर ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या संभाव्य कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. (हेही वाचा - Russia-Ukraine War Casualties: रशिया-युक्रेन युद्धात दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू; जखमींची गणतीच नाही)

दरम्यान, जवळपास 3 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेन एका भयानक संकटाचा सामना करत आहे. युक्रेनमधील अनेक प्रमुख शहरे उध्वस्त झाली आहेत. या युद्धात हजारो सैनिक आणि लोक मारले गेले आहेत. तर हजारो लोक अपंगही झाले आहेत.