संपूर्ण जागाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसला (Coronavirus) प्रतिबंध करणारी लस अमेरिकेतील संशोधकांनी शोधली आहे. या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली असून अमेरिकेत पहिली लस देण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (National Institutes of Health) आणि मॉडर्ना इंक (Moderna Inc) यांनी एकत्रितपणे या लसीचा पहिला डोस दिला. रिपोर्ट्सनुसार लसीच्या प्रयोगासाठी सहभागी झालेल्या एका व्यक्तीला ही लस देण्यात आली आहे. ही लस कैसर परमानेंट वॉशिंग्टन आरोग्य संशोधन (Kaiser Permanente Washington Health Research Institute) संस्थेत देण्यात आली असून त्या ठिकाणी कोरोना व्हायरसच्या लसीचे ट्रायल सुरु आहे. (दिलासादायक: अमेरिकेत आजपासून सुरु होणार कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी; 45 युवकांवर होणार ट्रायल)
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लशीची चाचणी पूर्ण होण्यास वर्ष ते 18 महिने इतका कालावधी लागेल. एनआयएचद्वारे अनुदानीत क्लिनिकल ट्रायल दरम्यान 45 तरुण निरोगी स्वयंसेवकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला. तसंच या लसीमुळे स्वयंसेवकांना कोणताही संसर्ग होण्याची भीती नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
ANI Tweet:
Researchers in US give first shot to person in experimental COVID-19 vaccine test
Read @ANI Story | https://t.co/C8iANnHdgq pic.twitter.com/4DdhZyKxvv
— ANI Digital (@ani_digital) March 16, 2020
कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या लक्षात घेता जगभरातील अनेक संशोधक यावर लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. काही संशोधक तर या विषाणूपासून महिना किंवा दोन महिने संरक्षण करेल, अशी लसही शोधत आहेत.
कोरोना व्हायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून 156,000 लोकांना याचा संसर्ग झाला आहे. तर 5,800 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला 'जागतिक आरोग्य संकट' म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेत 3000 लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून 50 लोक मरण पावले आहेत. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या 125 असून यात सातत्याने वाढ होत आहे.